यवतमाळ :- मुलांचे शासकीय बालगृह, निरीक्षणगृह येथे नदीम शाह सलीम शाह या बालकास बाल कल्याण समितीच्या आदेशाने दि.20 एप्रिल रोजी दाखल करण्यात आले होता. या बालकाचे दि.23 एप्रिल रोजी बालगृह, निरीक्षणगृह येथून पलायन केले आहे.
याबाबत पोलिस स्टेशन अवधुतवाडी येथे एफआयआर दाखल करण्यात आला आहे. बालकाचा यवतमाळ शहरातील वर्दळीच्या ठिकाणी तसेच बस स्टॉप, ट्रॅव्हल पाँईट, आठवडी बाजार मंदीर परिसर इत्यादी ठिकाणी शोध घेण्यात आला आहे. परंतु बालक अजूनपर्यंत आढळून आले नाही. बालकाने पलायन केले त्यावेळी बालकाच्या अंगावर काळी टीशर्ट, निळी पँट परिधान केलेली आहे. सदर बालक बालक आढळून आल्यास जिल्हा बाल संरक्षण कक्षास कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.