यवतमाळ :- भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण फी, परीक्षा फी योजनेचे नवीन व नूतनीकरणचे अर्ज स्विकारण्याची अंतिम मुदत दि. 30 एप्रिल ही आहे. या मुदतीत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सदर मुदतवाढ ही अंतिम स्वरुपाची असल्याने दि. 30 एप्रिल पूर्वी अर्ज स्विकारण्याची कार्यवाही करण्यात येईल. या कालावधीनंतर अर्ज प्रलंबित राहिल्यास सर्वस्वी जबाबदारी महाविद्यालयाची राहील, तसेच अर्ज भरलेल्या पात्र विद्यार्थ्यांकडून महाविद्यालयांना शिक्षण शुल्क घेता येणार नाही, असे इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सहाय्यक संचालक मंगला मुन यांनी कळविले आहे.