संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या परिसरात एका 17 वर्षीय अल्पवयीन तरुणीशी इन्स्ट्राग्राम वर ओळख करून प्रेमप्रकरणातून लग्नाचे आमिष देऊन सह मित्रासह कन्हान ,कामठीत ठीकठिकानी शारीरिक संबंध प्रस्थापित केले.ही घटना 22 मार्च ला रात्री आठ दरम्यान घडली असून यासंदर्भात पिडीतेने स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून आरोपी अमान,बबलू, राज,मोनू , हुजैर सर्व राहनार कामठी विरुद्ध भादवी कलम 376,417,341,34 भादवी सहकलम 4,6,8,10,12 बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण व अधिनियम 2012 अनव्ये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.