नागपूर :- गुन्हेशाखा युनिट क. १ चे अधिकारी व अंमलदार हे पोलीस ठाणे प्रतापनगर हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना, त्यांना मिळालेल्या खात्रीशीर माहिती वरून पडोळे हॉस्पीटल चौक, सार्वजनीक ठिकाणी रिंग रोड, येथे आरोपी अक्षय सुधाकर कोडवते, वय २७ वर्षे, रा. गोपाल नगर, परसोडी, प्रतापनगर, नागपूर यास तो मोबाईलवरून आय. पी. एल मधील चालु असलेले लाईव्ह किकेट मॅचवर सट्टयाची ऑनलाईन खायवळी करतांना प्रत्यक्ष मिळुन आला, आरोपीचे ताब्यातुन एक ओपो कंपनीचा मोबाईल व रोख २,०००/- रू असा एकुण २२,०००/- रू. चा मुद्देमाल जप्त करून आरोपीविरूध्द पोलीस ठाणे प्रतापनगर येथे कलम १२ (अ) महा, जुगार प्रतिबंधक कायदा सहकलम ६६ आयटी अॅक्ट अन्वये कारवाई करण्यात आली. वरील कामगिरी मा. पोलीस उप आयुक्त (डिटेक्शन), सहा. गुन्हेशाख युनिट क. १ चे अधिकारी व अंमलदार यांनी केली.