कांद्री, कोंढाळी आणि घारतवाडा गावात जनसंवाद अभियानाचे जल्लोषात स्वागत

रामटेक :-महायुतीचे उमरेडचे माजी आमदार तसेच महायुतीचे रामटेक लोकसभा निर्वाचन क्षेत्राचे शिवसेनेचे लोकप्रिय उमेदवार राजू देवनाथ पारवे यांच्या काटोल विधानसभा क्षेत्रातील जनसंवाद अभियान कांद्री, कोंढाळी आणि घारतवाडा ह्या गावात जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी जनसंपर्क पदयात्रा आणि कॉर्नर सभेचे आयोजन गावात करण्यात आले.

याप्रसंगी शिवसेनेचे उमेदवार राजू पारवे आणि भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार आशिष देशमुख यांनी गावातील समस्या जाणून घेतल्या. जनसंवाद अभियानात रामटेक क्षेत्रातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, पीपल्स रिपब्लिकन पार्टी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले), बहुजन रिपब्लिकन एकता मंच, रासपसह महायुतीच्या घटक पक्षातील वरिष्ठ पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

बाईक रॅलीतून ‘कमी मतदान क्षेत्र अन् मोठ्या रहिवासी इमारतीत’ मतदानाचा जागर

Tue Apr 9 , 2024
– मनपाच्या बाईक रॅलीदरम्यान मतदारांनी दिली मतदानाची ग्वाही नागपूर :- भारतीय संविधानाने १८ वर्षावरील प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार दिला आहे. मतदान हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे, तरी देखील नागरिक मतदानासाठी उदासीन असल्याचे दिसून येते, वर्ष २०१९ मध्ये नागपुरातील ज्या भागांमध्ये मतदानाची टक्केवारी कमी होती, अशा ‘कमी मतदान क्षेत्र आणि मोठ्या रहिवासी इमारतीसह शहरातील विविध भागांमध्ये मतदार जनजागृतीसाठी स्वीप कार्यक्रम अंतर्गत […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com