लोकसभा निवडणूक : आज 4 नामांकन दाखल

यवतमाळ :- यवतमाळ- वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी आज दिनांक 2 एप्रिल रोजी एकून 4 उमेदवारांनी एकूण 7 नामनिर्देशनपत्र निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांच्याकडे दाखल केले.नामनिर्देशनपत्र दाखल केलेल्या उमेदवारांमध्ये संजय उत्तमराव देशमुख, पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे एकून 2 अर्ज, अनिल जयराम राठोड, पक्ष समनक जनता पार्टी एकून 3 अर्ज, संदीप संपत शिंदे, अपक्ष 1 अर्ज, मनोज महादेव गेडाम, अपक्ष 1 अर्ज यांचा समावेश आहे. आतापर्यंत एकून 5 उमेदवारांनी नामनिर्देशपत्र दाखल केले आहे.तसेच आज 15 व्यक्तींनी 22 नामांकन अर्जाची उचल केली. याप्रमाणे नामनिर्देशन प्रक्रियेस सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत एकून 75 व्यक्तींनी 132 अर्जाची उचल केली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अत्याधुनिक लेझर मशीनचा लाभ घेण्याचे आवाहन

Wed Apr 3 , 2024
यवतमाळ :- श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात त्वचा व गुप्तरोगशास्त्र विभागामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या तीन लेझर मशीन उपलब्ध झाल्या आहे. रुग्णांनी या मशिनचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. रुग्णांना उत्तम दर्जाच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून वैद्यकीय महाविद्यालयात वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा निर्माण करण्यात आल्या आहे. त्यात आणखी या तीन मशिनची भर पडली आहे. त्वचा व गुप्तरोगशास्त्र विभागामध्ये प्राप्त […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com