कुलरचा वापर सावधगिरीने करून मृत्यूला थांबवा

नागपूर :- नागपूरसह संपुर्ण विदर्भात ऊनाची दाहकता दिवसेंदिवस वाढत आहे, तापमानाचा पारा सातत्त्याने वर-वर जात आहे. या वाढत्या तापमानाची दाहकता कमी करण्यासाठी घरोघरी व कार्यालयांतून कुलरचा वापर सुरु होत आहे. कुलर वापर करतेवेळी काही शुल्लक गोष्टींकडे दुर्लक्ष केल्याने आणि योग्य खबरदारी न घेतल्यास आपल्या घरातील कुलर मृत्यूचे कारण बनू शकते. गेल्या काही वर्षांमध्ये कूलरचा करंट लागून अनेकांचा मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. अशा घटना टाळण्यासाठी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन महावितरणतर्फ़े करण्यात आले आहे.

… तर वाचू शकतो जीव!

कूलर लावण्यापूर्वी घरातील अर्थिंग सक्षम असल्याची चाचणी अधिकृत कंत्राटदार किंवा इलेक्ट्रिशियनकडून करून घ्यावी, अर्थिंग व्यवस्था योग्य नसल्याने अशा घटना घडतात. याशिवाय बाजारात आयएसआय मार्क नसलेले ‘लोकल’ कूलर विक्रीला आहेत. अशा कूलरमुळेही विजेचा शॉक लागण्याचा धोका आहे. विजेचा धक्का हा जीवघेणाच असतो. पण, पुरेशी खबरदारी घेतली तर विजेच्या धक्क्यामुळे होणारा मृत्यू टाळता येऊ शकतो, घरात ‘अर्थ लिकेज सर्किट ब्रेक’ (ईएलसीबी) हे उपकरण बसविले तर जीव वाचू शकतो. हे उपकरण असल्यास अपघाताच्यावेळी वीजपुरवठा खंडित होतो व जीव वाचतो. कूलरचा वापर करतेवेळी पुढिलप्रमाणे काळजी घेण्याचे आवाहन देखील महावितरणने केले आहे.

अशी घ्या काळजी…

• कूलरच्या बॉडीला अर्थिंग जोडलेली आहे ‍किंवा नाही, याची खात्री करून घ्या.

• कूलरची वायरिंग योग्य आणि त्रुटीमुक्त असल्याची खात्री करा.

• कूलरचा स्विच बंद करून व प्लग सॉकेटमधून बाहेर काढूनच पाणी भरावे.

• घरातील वीजसंच मांडणीला ई.एल.सी.बी. किंवा आर.सी.सी.बी. ही उपकरणे जोडण्यात यावीत.

• कूलर सुरू असताना त्यात करंट येत असल्याचे लक्षात आल्यास तो त्वरित बंद करून त्याची चाचणी करूनच पुन्हा लावावा किंवा अशा नादुरुस्त कूलरचा उपयोग करू नये.

• ओल्या हातने कुलर हाताळु नका.

• कूलरच्या सानिध्यात कुणी व्यक्तीला विजेचा धक्का लागल्यास त्या व्यक्तीस हात लावू नये.

• कोरड्या लाकडी रॉडने त्या व्यक्तीस कूलरपासून वेगळे करावे व त्वरित वैद्यकीय उपचाराकरिता डॉक्टरकडे पाठवावे.

• जोड असलेल्या वायरने कूलरला वीजपुरवठा देण्यात येऊ नये. त्याकरिता अखंड वायर वापरण्यात यावा.

• कूलर चालू करण्यापूर्वी, पॉवर कॉर्ड आणि प्लग मध्ये कोणतीही खराब झालेली भाग नाही याची खात्री करा.

• कूलरला नेहमी एका स्वतंत्र पॉवर सॉकेटवर लावा.

• कधीही एकाच सॉकेटवर अनेक उपकरणे चालू करू नका.

• लहान मुलांना कूलरपासून दूर ठेवा.

• पावसाळ्यात कूलर वापरणे टाळा

• कूलरची नियमितपणे तपासणी करून दुरुस्ती करून घ्या.

• कूलरची नियमितपणे देखभाल करा.

– उपमुख्य जनसंपर्क अधिकारी, 

महावितरण, नागपूर

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

दासबालक ते प्रियबालक उदयभान उके चा काव्य लेखन प्रवास प्रेरणा दायक 

Sat Mar 30 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- समतेच्या प्रवाहातील सजग सैनिक मिल मजदूर अल्प शिक्षित असुन सुद्धा डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र आदोलनात अग्रगण्य काव्य लेखन गायन करून अज्ञान अंधकार चमत्कार अनिष्ट असंभ्य रूढी, अन्याय अत्याचार जोर जुलूम विरूद्ध लढण्यास सज्ज करूण दासबालक या नावाने चिरपरिचीत पण धंम्म क्रान्ती नंतर प्रियबालक या नावाने गाव कुसातील जनसामान्य लोकापर्यत धम्म विचार प्रसारीत करून […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com