नागरिकांना ऑनलाईन पाहता येईल उमेदवारांची माहिती संकेतस्थळ व मोबाईल ॲप चा करा वापर – जिल्हाधिकारी

गडचिरोली :- 12- गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदार संघात निवडणुकीसाठी उमेदवारांकडून दाखल करण्यात येणारे नामनिर्देशन पत्र व त्यासोबतचे शपथपत्र भारत निवडणुक आयोगाच्या https://affidavit.eci.gov.in या संकेतस्थळावर नियमितपणे अपलोड करण्यात येत आहे. यामुळे नागरिकांना उमेदवारांची माहिती सहजपणे जाणून घेता येणार आहे. यासोबतच ‘नो युवर कॅन्डीडेट’ (Know Your Candidate-KYC) या ॲपच्या माध्यमातूनही उमेदवारांची माहिती व गुन्हेगारी पूर्ववृत्तबात माहिती जाणून घेता येणार आहे. हे ॲप अड्रॉईड व आयओएस दोन्ही प्लॅटफॉर्मसाठी प्लेस्टोअरवर उपलब्ध आहे.

नागरिकांनी या संकेतस्थळावरून व मोबाईल ॲप द्वारे उमेदवारांनी सादर केलेली माहिती जाणून घ्यावी, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी संजय दैने यांनी केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

आचारसंहितेमुळे लोकशाही दिन नाही

Thu Mar 28 , 2024
यवतमाळ :- भारत निवडणूक आयोगाने दिनांक 16 मार्च रोजी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहिर केला आहे. आयोगाने निवडणूक जाहीर केलेल्या दिनांकापासून आदर्श आचार संहिता लागू झालेली आहे. सबब निवडणुकीच्या कालावधीत निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेल्या दिनांकापासून ते निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याच्या दिनांकापर्यंत म्हणजे दि. 6 जून 2024 पर्यंत आचारसंहितेमुळे लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही, याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असे निवासी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com