लोकसभा निवडणूक 2024 मध्ये विदर्भ आणि नाशिक क्षेत्रात रोख रक्कम, मौल्यवान वस्तू इत्यादींचा बेकायदेशीर वापर होत असल्यास त्या संबंधित माहिती/ तक्रारींसाठी नागपूरच्या प्राप्तिकर विभागाने 24×7 नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे

नागपूर :- नागरिक दूरध्वनी, व्हॉटसअॅप अथवा ईमेलद्वारे त्यांच्या तक्रारी नोंदवू शकतात किंवा माहिती देऊ शकतात.

लोकसभा सार्वत्रिक निवडणुका, 2024 ची प्रक्रिया संपूर्ण भारतात सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर, लोकसभा निवडणूक 2024 मध्ये विदर्भ आणि नाशिक प्रदेशात क्षेत्रात रोख रक्कम, मौल्यवान वस्तू इत्यादींचा बेकायदेशीर वापर होत असल्यास त्या संबंधित माहिती/ तक्रारींसाठी नागपूरच्या प्राप्तिकर विभागाने 24×7 नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. नियंत्रण कक्ष दिवसाचे 24 तास, आठवड्याचे सातही दिवस ( 24×7 ) कार्यरत राहील.

लोकसभा निवडणूक 2024 मधे, नाशिक आणि विदर्भ विभागात, रोख रक्कम, मौल्यवान वस्तू यांचा बेकायदेशीर हेतुने वापर होत असेल तर नागरिक पुढिल संपर्क क्रमांक किंवा ईमेलद्वारे आपली तक्रार नोंदवू शकतात अथवा त्या संबंधित माहिती देऊ शकतात.

टोल फ्री क्रमांक :1800-233-0355

टोल फ्री क्रमांक :1800-233-0356

व्हॉटसअॅप क्रमांक :9403390980 (छायाचित्र, चित्रफीत इत्यादी पाठवण्यासाठी)

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

युवा महिला ऍथलीट्सना सक्षम करण्यासाठी, भारतीय लष्कराने पुण्यातील लष्करी क्रीडा संस्थेत सुरू केली लष्करी युवती क्रीडा कंपनी

Thu Mar 21 , 2024
पुणे :- तिरंदाजी, ॲथलेटिक्स, मुष्टियुद्ध आणि भारोत्तोलन या चार क्रीडा प्रकारांमध्ये, महिला युवा खेळाडूंना अधिकाधिक प्रोत्साहन आणि मार्गदर्शन मिळावे, यासाठी, भारतीय लष्कराने एक अत्यंत महत्वाचे पाऊल टाकत, आर्मी स्पोर्ट्स गर्ल्स कंपनी, म्हणजे लष्कती युवती क्रीडा कंपनी स्थापन केली आहे. या कंपन्यांच्या कार्यान्वयासाठी, दोन उत्कृष्टता केंद्रे स्थापन करण्याच्या दृष्टीने जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. या जागा म्हणजे, मउ इथले आर्मी मार्क्समॅनशिप […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com