मतदानाले जा जो….! मतदार जागृतीचे जिल्हाभरात विविध उपक्रम

– छोटयांची मोठी गोष्ट सांगत विदयार्थानी केली जनजागृती

भंडारा :- लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाला आहे. जिल्हा प्रशासनाकडून जिल्हाभरात मतदारांमध्ये जनजागृती कार्यक्रम घेण्यात येत आहेत.जिल्हा स्वीप नोडल अधिकारी तथा शिक्षणाधिकारी माध्यमिक रविंद्र सलामे यांच्या चमुकडुन अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहेत.

आज झाडीबोली भाषेतील मतदारांना मतदानासाठी आवाहन करणारी एक छोटी क्लिप समाज माध्यमांवर लोकप्रिय झाली.या छोट्या youtube व्हिडीओ मध्ये लालबहादूर शास्त्री शाळेतील विदयार्थ्यानी छोटयांची मोठी गोष्ट सांगत मतदार जागृतीचा संदेश दिला.

मतदान प्रक्रियेत अधिकाधिक मतदारांनी सहभागी व्हावे, आपल्या एका मताचे महत्त्व कळावे, जेणेकरून पैशांनी मते विकली जाण्याचा प्रकार होऊ नये यासाठी प्रयत्न केला जात आहे. निवडणुकांच्या माध्यमातून देशाची लोकशाही प्रक्रिया मजबूत करण्यासाठी आपले मत योग्य उमेदवारास देणे महत्त्वाचे आहे. याबाबतची जागृती लोकांमध्ये केली जात आहे.

मतदारांना राजकीय पक्ष पैशांचे प्रलोभन दाखवून प्रभावित करण्याचा प्रयत्न करतात. लोकशाहीसाठी अशा गोष्टी फारच घातक आहेत. एका मताचे महत्त्व लोकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न मतदार जागृती मोहिमेतून करण्यात येत आहे.

झाडीबोलीचा प्रभावी वापर मतदार जागृतीमध्ये करण्यात येत आहे. त्यामध्ये गोंडी, लोधी तसेच स्थानिक झाडीपट्टीतील लहेजा वापरून मतदार जागृतीचा संदेश अधिक प्रभावी केलेला आहे.

समाज माध्यमाचाही वापर जिल्ह्यातील मतदार प्रचार प्रसिध्दीबाबत स्वीप टीमने व्हॉटस्अप चॅनेलवर तसेच युटूब वर देखील प्रसारित करण्यात येत आहे.मतदान हे देशाच्या सामाजिक, आर्थिक विकासासाठी किती मौल्यवान आहे ,हे विद्यार्थ्यांनी एसटी बस स्टँडसह अनेक नागरी भागातही जाऊन सांगितले . महाविद्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणावर मतदार साक्षरता क्लब स्थापन झाले आहेत.

मतदार जागृती अभियान सुरू केले आहे. लोकशाही मजबूत करण्यासाठी मतदानाचा टक्का वाढायला हवा. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये तसेच नव मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात येत आहे.त्यांना मतदान अधिकारांचे महत्त्व पटवून दिले जात आहे. स्वीप चमुच्याद्वारे जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये देखील मोठ्या प्रमाणात जनजागृती सुरू आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी योगेश कुंभेजकर.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

लोकसभा निवडणूक 2024 मध्ये विदर्भ आणि नाशिक क्षेत्रात रोख रक्कम, मौल्यवान वस्तू इत्यादींचा बेकायदेशीर वापर होत असल्यास त्या संबंधित माहिती/ तक्रारींसाठी नागपूरच्या प्राप्तिकर विभागाने 24x7 नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे

Thu Mar 21 , 2024
नागपूर :- नागरिक दूरध्वनी, व्हॉटसअॅप अथवा ईमेलद्वारे त्यांच्या तक्रारी नोंदवू शकतात किंवा माहिती देऊ शकतात. लोकसभा सार्वत्रिक निवडणुका, 2024 ची प्रक्रिया संपूर्ण भारतात सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर, लोकसभा निवडणूक 2024 मध्ये विदर्भ आणि नाशिक प्रदेशात क्षेत्रात रोख रक्कम, मौल्यवान वस्तू इत्यादींचा बेकायदेशीर वापर होत असल्यास त्या संबंधित माहिती/ तक्रारींसाठी नागपूरच्या प्राप्तिकर विभागाने 24×7 नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. नियंत्रण […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!