सिक्खांना कोणतेही आरक्षण नको, आम्ही स्वबळावर आपला विकास साधण्यास समर्थ आहो, होतो व राहू – धुन्नाजी

चंद्रपूर :- ऑल इंडिया सिख सोशल वेलफेअर फेडरेशनचे अध्यक्ष सरदार हरविंदरसिंह धून्नाजी यांनी राष्ट्रीय स्तरावरील समाजाचे धर्म व राष्ट्रनिष्ठ मंडळींशी संवाद साधून समाजाच्या वतीने सिख गुरूंचा संदेश “मानस की जात एकहें समझो” यानुसार सिख धर्मात जाती व उपजातींना कुठेही थारा दिलेला नाही. कर्म करा, श्रम करा, धर्म करा, प्रभू नाम स्मरण करा व आपले प्रभुत्व आपल्या स्वबळावर निर्माण करा. कोणत्याही प्रकारच्या सवलती व आरक्षणाची भीक सिख मागत नसतो सर्व माणसासारखे तुम्हीही माणूस आहात. अनेक मंडळी आर्थिक दुर्बळ आहे व असते मग काही समाजांनी आरक्षणाची अपेक्षा करणे आपली लाचारी दर्शविणे ही बाब कुठपर्यंत रास्त आहे. याचे आम्हास सर्व भारतीयांना विशेषतः सिक्खांनी सदैव लक्षात ठेवता शासनाने सुद्धा लक्षात घ्यावे की, कधी या विषयावर “ब्र” शब्दाने सिक्खांनी अपेक्षा जाहीर केली नाही व करणारही नाही. आज राष्ट्राला प्रगत करायचे असेल तर त्यांना स्वबळावर उभे राहण्याचा श्रम करण्याचा आपले अस्तित्व स्वतः निर्माण करून स्वाभिमानाने जगण्याचा व जनतेकडून कराच्या रूपाने वसूललेल्या रकमातून निशुल्क धान्य, विविध गिफ्ट, भविष्यातील मतदानाच्या अपेक्षणे रांगेत उभे करून लाचारीने स्वीकारण्याची त्यांची भूमिका संपविल्या गेली पाहिजे. जनसामान्यांच्या हातांना काम कसे मिळेल व त्यांचे उचित दाम त्यांना मिळावे व त्यांनी निर्भय होऊन कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता सत् विवेक बुद्धीने मतदानाला सामोरे जावे. अशी परिस्थिती निर्माण झाली पाहिजे शिखांमध्ये महिला आणि पुरुषास समान दर्जा आहे. सिख धर्म म्हणतोय “ता क्यो मंदा आखीए, जीन जम्मे राजानं” अर्थात ज्या स्त्रीच्या उदरातून देवाने सुद्धा जन्म घेतला. ज्या स्त्रियांनी या विश्वाच्या निर्मितीस साकार व प्रगत रूप दिले त्यांच्याबद्दल गुरुवाणी काय म्हणते, ही बाब सिक्खांनी सदैव स्मरणात ठेवून आज विश्वाच्या कानाकोपऱ्यात सिखं अनुयायी स्वबळावर व्यवसाय, उच्च शिक्षण घेऊन विविध देशात त्या-त्या सरकारच्या सत्तेत भागीदार होऊन त्या-त्या राष्ट्राच्या विकासाला हातभार लावत असताना भारतात काही राष्ट्रद्रोही सिक्खांच्या नावाने प्रलोभन व दबाव तंत्र निर्माण करून वारंवार खालीस्तान, खालीस्तान चा नारा व हा वलय जिवंत ठेवून सिक्खांना सिक्खांच्या वरती यांनी ज्यांच्या सिख गुरूंनी हिंदू धर्मासाठी सर्वपरी बलिदान दिले. तसेच देशाच्या स्वातंत्र्यासाठी दिलेल्या प्राणाच्या आहुत्या न विसरता जर खालीस्तानवादी ह्या शब्दाचा वापर बंद करून हे व्यक्ती राष्ट्रद्रोही असल्याने त्यांचा उल्लेख आतंकवादी म्हणून करण्यात यावा. जेणेकरून येणाऱ्या पिढीस चुकीनेही दुजाभाव निर्माण होणार नाही व खालीस्तानवादी हा शब्दच कायमचा समाप्त होईल.

सिखाना देशाकडून व आमच्या देशाच्या सरकारकडून एकच अपेक्षा आहे की भारतीय संविधानाप्रमाणे आमच्या धर्मनिरपेक्ष राष्ट्रात सर्व भारतीयांना आपापल्या धर्माची अर्चना करून निर्भय वातावरणात स्वबळावर शासनाने त्यांच्यासाठी रोजगार उपलब्ध करून द्यावे व त्यांचा लाभ घेऊनचं आपला राष्ट्र सुजलाम् सुफलाम् व्हावा व देशातून जनसामान्यांच्या डोक्यातून लाचारी, आरक्षण हा शब्दच समाप्त करण्यासाठी सिक्खं समाजातील बुद्धीजीवांना एकत्र घेऊन राष्ट्राची प्रगती व सिखं धर्माचा पावन उद्देश “कर्म करो, नाम जपो, बाटकर खाओ” यापुढे “ना कोई बैरी, ना बेगाना” हा संदेश या समाजात रुजवावा. असे मनोगत “विचारमंथन” सभेतून सरदार हरविंदरसिंह धून्नाजी प्रांताध्यक्ष- ऑल इंडिया सिखं सोशल वेलफेअर फेडरेशन व त्यांच्या सहकाऱ्यांनी व्यक्त केले असुन निर्भयपणाने लोकशाही मानणार्या धर्मनिरपेक्ष राष्ट्रात सर्व सुखाने नांदो असे राष्ट्र निर्माण करण्याचे आवाहन केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मतदानाले जा जो....! मतदार जागृतीचे जिल्हाभरात विविध उपक्रम

Thu Mar 21 , 2024
– छोटयांची मोठी गोष्ट सांगत विदयार्थानी केली जनजागृती भंडारा :- लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाला आहे. जिल्हा प्रशासनाकडून जिल्हाभरात मतदारांमध्ये जनजागृती कार्यक्रम घेण्यात येत आहेत.जिल्हा स्वीप नोडल अधिकारी तथा शिक्षणाधिकारी माध्यमिक रविंद्र सलामे यांच्या चमुकडुन अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहेत. आज झाडीबोली भाषेतील मतदारांना मतदानासाठी आवाहन करणारी एक छोटी क्लिप समाज माध्यमांवर लोकप्रिय झाली.या छोट्या youtube व्हिडीओ मध्ये लालबहादूर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!