संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– जागतिक महिला दिना निमित्त “निर्धार महिला पुरस्कार २०२४ समारंभ थाटात
कामठी :- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी मुलीन करिता शिक्षणाची दारे उघडलीत त्यामुळे आज समाजातील व पर्यायाने देशाची प्रगती ची दोरी आता सावित्रीच्या लेकीच्या हातात असल्याचे मत अॅड. सुलेखा कुंभारे यांनी व्यक्त केले. निर्धार महिला व बाल विकास समितीच्या वतीने आयोजित ‘निर्धार पुरस्कार २०२४ वितरण समारंभाच्या कार्यक्रमात बोलत होत्या.
जागतिक महिला दिनानिमित्त ‘निर्धार महिला व बाल विकास समिती तर्फे आज रविवार रोजी दुपारी १२.३० वाजता, उत्तर नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय कनव्हेंशन सेंटर, विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या महिलांचा “निर्धार महिला पुरस्कार-२०२४ प्रदान समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
सुरूवातीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १२७ व्या स्मृति दिना निमित्त क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला अॅड. सुलेखा कुंभारे व मान्यवरांच्या हस्ते माल्र्यापण करून अभिवादन करण्यात आले तसेच द्विप प्रज्वलीत करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.
या प्रसंगी माजी महापौर माया इवनाते, महिला विभाग जमाते इस्लामी हिंद नागपुर च्या अध्यक्षा डॉ सबीहा खान, डॉ. सरिता मिलीद माने, रोशनी, सिध्दार्थ गायकवाड, डॉ. सविता कांबळे, रूबीना अजमत अंसारी, डॉ. प्रज्ञा मेश्राम इत्यादी मान्यवरांनी मार्मिक व मूलभुत मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमात निर्धार महिला व बालविकास समितीच्या संस्थापिका अध्यक्षा, माजी राज्यमंत्री अॅड, सुलेखा कुंभारे यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या स्त्रीयांना “निर्धार महिला पुरस्कार – २०२४ स्मृति चिन्ह व पुष्पगुच्छ देवून सम्मानित करण्यात आले. वंदना अरविंद राऊत, (सामाजिक क्षेत्र), बबीता सतीश बैसारे (सामाजिक क्षेत्र), रंजीता विनोद दहिवले, अध्यक्षा प्रतिष्ठा महिला बचत गट (सामाजिक क्षेत्र), माया इवनाते माजी महापौर, माजी सदस्य राष्ट्रीय आदिवासी आयोग, दिल्ली (राजकीय क्षेत्र), रूबीना अजगत अंसारी (शैक्षणीक क्षेत्र), डॉ. सविता कांबळे (साहित्यीक क्षेत्र), पुर्वाक्षी मनोज तातोडे, एम ए. आर्ट महाविद्यालय (कला क्षेत्र), साक्षी बांबेडे राष्ट्रीय कबड्डी पटू (क्रीडा क्षेत्र), सरीता राजन, युसीएन टिव्ही पॅनलच्या न्युज रिपोर्टर (पत्रकारीता क्षेत्र), डॉ. प्रज्ञा मेश्राम, आयुर्वेदीक तज्ञ (वैद्यकीय क्षेत्र) आदी महिलांचा समावेश होता.
कार्यक्रमाचे संचालन नंदा गोडघाटे यांनी केले. प्रास्ताविक माया कांबळे यांनी केले तर आभार अस्मिता बागडे यांनी मांडले कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.