संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या नागपूर जिल्हा निमंत्रक पदी कामठी येथील देशोन्नतीचे पत्रकार संदीप कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
समन्वयक म्हणून बाजारगाव येथील नवभारतचे पत्रकार गजेंद्र चंपतराव डोंगरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुढील दोन वर्षांसाठी या नियुक्तया असतील.दोघांनी प्रत्येक तालुक्यात जाऊन तेथे पत्रकार हल्ला विरोधी कृती समित्या स्थापन करावयाच्या आहेत..
पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे राज्य निमंत्रक एस.एम.देशमुख, मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष शरद पाबळे, महिला आघाडी प्रमुख शोभा जयपूरकर यांनी डोंगरे आणि कांबळे यांचे अभिनंदन केले असून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत..