नागपूर :- पोलीस ठाणे कळमना हद्दीत प्लॉट नं. २०१, कटरे सोसायटी, गुलमोहर नगर, कळमना, नागपुर येथे राहणाऱ्या फिर्यादी पल्लवी प्रफुल्ल वानखेडे, वय २८ वर्षे, यांचेसोबत राहणारी मैत्रीण आरोपी नामे रूपाली रमेश बोरपाटे, वय ३० वर्षे, रा. तमकुही राज, कुशीनगर (उत्तर प्रदेश) हिने फिर्यादीची नजर चुकऊन, त्यांचे पर्समधुन कपाटाची चाबी घेवुन, कपाटातील सोन्याचे वेगवेगळे प्रकारचे दागिने व नगदी ४०,०००/- रु. असा एकुण ७.४५,१३१/- रु. चा मुद्देमाल चोरून नेला याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तकारीवरून पोलीस ठाणे कळमना येथे कलम ३८० भा.द.वि. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याचे समांतर तपासात गुन्हेशाखा, युनिट क. ५ चे अधिकारी व अंमलदार यांनी तांत्रीक तपास तथा गुप्त माहीतीव्दारे आरोपीस उत्तरप्रदेश येथुन ताब्यात घेतले आरोपीस विचारपुस केली असता, तिने आपले नांव रूपाली रमेश बोरघाटे उर्फ रूपाली राजु गोडचाटे उर्फ रूपाली श्रीराम जोशी उर्फ रूपाली मोहसिन सिद्दीकी, यय ३० वर्षे, रा. तमकुही राज, कुशीनगर (उत्तर प्रदेश) असे सांगून, वर नमुद गुन्हा केल्याची कबुली दिली. आरोपीचे ताब्यातुन १६६ ग्रॅम सोने व ईतर साहीत्य असा एकुण १०,४८,१६०/- रू. या मुद्देमाल जप्त करण्यात आला पुढील कारवाई कामी आरोपीस जप्त मुद्देमालासह पोलीस ठाणे यांचे स्वाधीन करण्यात आले.
वरील कामगिरी अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), पोलीस उप आयुक्त (डिटेक्शन) यांचे मार्गदर्शनाखाली पोनि. राहुल शिरे, सपोनि, विक्रांत थारकर, पंकज भोपळे, पोउपनि अभिषेक बागळे, पोहवा. रोनाल्डो अॅन्थोनी, महादेव पोटे, नापोभं राजेंद्र टाकळकर, अमोल भक्ते, मपोझं अश्विनी यांनी केली.