उमरेड :- मौजा खेडी शिवार येथील तारणा फाटा, उमरेड ते सेव डांबरी रोडवर उमरेड ०३ किमी पूर्व येथे दि. २५/०२/२४ चे १०/०० वा. ते १०/३० वा. दरम्यान सन २०२३ मध्ये झालेल्या गामपंचायत मौजा सेव येथील निवडणुकीत फिर्यादी नामे- विकास पांडुरंग मेश्राम, वय ५० वर्षे, रा. सेव ता. उमरेड ग्रामपंचायत सेव व फिर्यादीची पत्नी उभे होते. त्यात दोघेही निवडून येवुन फिर्यादी सदस्य झाले व फिर्यादीची पत्नी उपसरपंच झाली तसेच सेव गावात राहणारा आरोपी राजेश उर्फ लादेन देवराव हजारे, वय ४७ वर्षे, रा. उमरेड हा आधी सरपंच पदावर होता व सन २०२३ मध्ये झालेल्या निवडणुकीत हरलेला होता. त्यामुळे त्याच्यात व फिर्यादीत वादविवाद असुन दि. २५/०२/२४ रोजी सकाळी अंदाजे १०/०० या दरम्यान फिर्यादी मोटार सायकलने आंबेडकर कॉलनी उमरेड येथुन मौजा सेव येथील शेतीवर जाण्यासाठी निघाले असता तारण्या फाट्यापासुन सेवकडे जाणा-या रोडवर जात असताना मागुन एक पांढ-या रंगाची कार आली व त्यामधील इसमाने चालत्या गाडीतुन फिर्यादीच्या पाठीवर लोखंडी रॉड मारून ‘तुने मले ईलेक्शनमध्ये हरविलास तुला जास्त मस्ती चढली आहे आणि अनिकेतला ग्रामपंचायतच्या कामावरून का काढले, त्याचे हात पाय तोड” म्हणून राजेश उर्फ लादेन देवराव हजारे, वय ४७ वर्षे, रा. उमरेड व अनिकेत नामडे गणवीर, वय २५, रा. उमरेड यांनी त्यांच्या जवळील लोखंडी रॉडने फिर्यादीच्या दोन्ही हातावर दोन्ही पायावर मारुन दोन्ही हात पाय फॅक्चर करुन जिवानीशी ठार मारण्याचा प्रयत्न केला.
सदर प्रकरणी फिर्यादी यांचे रीपोर्ट वरून पोस्टे उमरेड येथे आरोपीतांविरूद्ध कलम ३०७, ३४ भांदवि, सहकलम ३(२) (व्ही ए) अनुसुचित जाती जमाती प्रतिबंध अधिनियम अन्वये गुन्हा नोंद केला आहे. सदर गुन्हयातील दोन्ही आरोपीतांना उमरेड पोलीसांनी ४ तासाचे आत अटक केली आहे.