दिमाखदार सोहळ्यात राज्य चित्रपट पुरस्कारांचे वितरण, वाय चित्रपट ठरला सर्वोत्कृष्ट

– दीपक डोब्रियाल आणि मृण्मयी देशपांडे ठरले सर्वोत्कृष्ट अभिनेता – अभिनेत्री

– संजय पाटील यांचे ‘आभाळसंग मातीचं नांदन’ ठरले उत्कृष्ट गीत

– मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत विजेत्यांना पुरस्कार प्रदान

मुंबई :- सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी, कलाकारांचे बहारदार नृत्य, कार्यक्रमांच्या प्रारंभीच सादर झालेली गणेश वंदना आणि शिवराज्याभिषेक वर्षाच्या पार्श्वभूमीवर सादर झालेल्या कार्यक्रमांनी 57 व्या राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात चांगलीच रंगत भरली. यावेळी दादासाहेब फाळके सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मान ‘वाय’ या चित्रपटाने मिळविला. या चित्रपटाचे दिग्दर्शक अजित वाडीकर यांना भालजी पेंढारकर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून गौरविण्यात आले. बाबा चित्रपटातील भूमिकेसाठी दीपक डोब्रियाल यास उत्कृष्ट अभिनेता तर मिस यू मिस्टर मधील भूमिकेसाठी मृण्मयी देशपांडे हिला उत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार मिळाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या पुरस्कारांचे वितरण झाले.

वरळी येथील डोम, एन एस सी आय येथे गुरुवारी रात्री राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा रंगला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आमदार ॲड. मनीषा कायंदे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे, किरण शांताराम, जब्बार पटेल, सचिन पिळगावकर, महेश कोठारे, महेश मांजरेकर आदींसह चित्र नाट्य सृष्टीतील अनेक नामवंत उपस्थित होते.

याच पुरस्कार सोहळ्यात महाराष्ट्र शासनाकडून दिला जाणारा राज्याचा सर्वोच्च नागरी सन्मान असणारा “महाराष्ट्र भूषण” पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना तर मानाचा “गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार” ज्येष्ठ पार्श्वगायक सुरेश वाडकर यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तसेच, मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीसाठी आपल्या कलेच्या माध्यमातून अनेक वर्ष योगदान देत रसिकांची व कलासृष्टीची सेवा करणाऱ्या ज्येष्ठ कलावंतांना दिला जाणारा राजकपूर जीवनगौरव आणि विशेष योगदान पुरस्कार, चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव आणि विशेष योगदान पुरस्कारही यावेळी प्रदान करण्यात आले.

राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यातील विविध वर्गातील पुरस्कार विजेते :-

दादासाहेब फाळके सर्वोत्कृष्ट चित्रपट क्र.१ –

वाय (अजित वाडीकर), भालजी पेंढारकर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक क्र.१ – वाय ( अजित वाडीकर). बाबूराव पेंटर उत्कृष्ट चित्रपट क्र.2 – मिस यु मिस्टर (श्रीम. दिपा त्रेसी). राजा परांजपे उत्कृष्ट दिग्दर्शक क्र. 2 -मिस यु मिस्टर (समीर जोशी). मा. विनायक उत्कृष्ट चित्रपट क्र.3 – स्माईल प्लिज (श्रीम. निशा सुजन /श्रीम, सानिका गांधी). राजा ठाकूर उत्कृष्ट दिग्दर्शक क्र.3- स्माईल प्लिज ( विक्रम फडणीस).

अनंत माने ग्रामीण प्रश्न हाताळणारा चित्रपट- (ताजमाल) नियाज मुजावर.

दादा कोंडके ग्रामीण प्रश्न हाताळणारा चित्रपट – ताजमाल ( कुलभूषण मंगळे).

दत्ता धर्माधिकारी सामाजिक प्रश्न हाताळणारा दिग्दर्शक -समीर विद्वांस (आनंदी गोपाळ).

व्ही. शांताराम सामाजिक प्रश्न हाताळणारा चित्रपट- आनंदी गोपाळ (मंगेश कुलकर्णी).

प्रथम पदार्पण चित्रपट निर्मिती – विशबेरी ऑनलाईन सर्विसेस प्रा.लि (झॉलिवूड).

प्रथम पदार्पण चित्रपट दिग्दर्शक – अच्युत नारायण (वेगळी वाट).

उत्कृष्ट अभिनेता कै. शाहू मोडक पारितोषिक व श्री शिवाजी गणेशन पुरस्कार -दीपक डोब्रियाल (बाबा).

उत्कृष्ट अभिनेत्री (कै.स्मिता पाटील पारितोषिक) – मृण्मयी देशपांडे (मिस यू मिस्टर).

उत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेता – कै.काशिनाथ घाणेकर पारितोषिक -अजित खोब्रागडे (झॉलिवूड).

उत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेत्री कै. रंजना देशमुख पारितोषिक – अंकिता लांडे (गर्ल्स).

उत्कृष्ट विनोदी अभिनेता कै. दामूअण्णा मालवणकर पारितोषिक -पार्थ भालेराव (बस्ता).

सहाय्यक अभिनेता – कै. चिंतामणराव कोल्हटकर पारितोषिक – रोहित फाळके (पांघरुण).

सहाय्यक अभिनेत्री – कै. शांता हुबळीकर व कै. हंसा वाडकर पारितोषिक – नंदिता पाटकर (बाबा).

उत्कृष्ट नृत्य दिग्दर्शक – राज्याभिषेक गीत सुभाष नकाशे (हिरकणी).

उत्कृष्ट पार्श्वगायिका- मधुरा कुंभार (गीत- आभाळसंग मातीचं नांदन ,मिस यू मिस्टर).

उत्कृष्ट पार्श्वगायक – सोनू निगम ( गीत- येशील तू, हिरकणी).

उत्कृष्ट पार्श्वसंगीत- प्रफुल्ल – स्वप्निल (स्माइल प्लिज).

उत्कृष्ट संगीत -कै. अरुण पौडवाल पारितोषिक

– अमितराज (हिरकणी).

उत्कृष्ट गीते – कै.ग. दि. माडगूळकर पारितोषिक – संजय कृष्णाजी पाटील (गीत- आभाळसंग मातीचं नांदन,हिरकणी).

उत्कृष्ट संवाद- कै.आचार्य अत्रे पारितोषिक इरावती कणिक (आनंदी गोपाळ).

उत्कृष्ट पटकथा- विक्रम फडणीस,इरावती कर्णिक (स्माईल प्लिज),

सर्वोत्कृष्ट कथा – कै. मधुसूदन कालेलकर पारितोषिक -पांघरुण.

याशिवाय, तांत्रिक गट आणि उत्कृष्ट बालकलाकार पुरस्कारही यावेळी देण्यात आले. यामध्ये, उत्कृष्ट कला दिग्दर्शन-(कै. साहेबमामा ऊर्फ फत्तेलाल पारितोषिक ) – सुनील निगवेकर, निलेश वाघ (आनंदी गोपाळ).

उत्कृष्ट छायालेखन ( कै. पांडुरंग नाईक पारितोषिक) – करण बी. रावत (पांघरुण)

उत्कृष्ट संकलन- आशिष म्हात्रे, अपूर्वा मोतीवाले (बस्ता).

उत्कृष्ट ध्वनीमुद्रण – अनुप देव (माईघाट),

उत्कृष्ट ध्वनिसंयोजन – मंदार कमलापूरकर (त्रिज्या),

उत्कृष्ट वेशभूषा- विक्रम फडणीस (स्माईल प्लिज),

उत्कृष्ट रंगभूषा – सानिका गाडगीळ (फत्तेशिकस्त)

उत्कृष्ट बालकलाकार (कै. गजानन जहागिरदार पुरस्कार) – आर्यन मेघजी (बाबा).

या दिमाखदार सोहळ्याचे सुत्रसंचलन अभिनेता अमेय वाघ आणि अभिनेत्री वैदेही परशुरामी यांनी केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार -२०२३ प्रदान

Fri Feb 23 , 2024
– ‘अष्टपैलू’ अशोक सराफ हे मराठी मातीतील अस्सल हिरा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे – जगाला हेवा वाटेल अशी मुंबईतील फिल्मसिटी बनवण्याचा प्रयत्न मुंबई :- आपल्या अविस्मरणीय भूमिकांनी अष्टपैलू अभिनेते अशोक सराफ यांनी प्रेक्षकांची अभिरुची संपन्न केली. अवघ्या महाराष्ट्राला त्यांनी पोट धरुन हसवले. प्रसिद्धीचे इतके वलय मिळूनही त्यांनी कधीही जमीनीशी नातं तोडलं नाही. खऱ्या अर्थाने ते मराठी मातीतील अस्सल हिरा आहेत, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!