कुही :- अंतर्गत ०३ कि. मी. अंतरावरील मौजा आकोली येथे दिनांक १३/०२/२०२४ चे २३.३० वा. दरम्यान पोलीस स्टेशन कुही येथील स्टाफ मौजा आकोली परिसरात पेट्रोलींग करित असतांना मुखबिराद्वारे खबर मिळाली की पाचगावकडे १० चक्का टिप्पर येत आहे. अशा मिळालेल्या माहितीवरून पाचगावकडे जाणान्या आकोली रोडवर नाकाबंदी केली असता १० चक्का टिप्पर क्र. एम. एच. ४०/ बी एफ ४८२४ येतांना दिसले त्यास त्यांचे नाव गाव विचारले असता आरोपी नामे- १) दर्शन शंभुजी रामटेके, वय २१ वर्ष रा. पाचगाव ता. उमरेड, २) अनुराग राजकुमार पंढरे वय १९ वर्ष रा. नवेगाव ता. उमरेड असे सांगितले, सदर वाहन चेक केले असता त्यामध्ये विना परवाना रेती दिसुन आली. कोणत्याही प्रकारचा परवाना मिळून आला नाही. त्यामुळे त्यांच्या ताब्यातुन १० चक्का टिप्पर क्र. एम एच-४०/वी एफ ४८२४ किंमती ३०,००,०००/- रू. व ताब्यात घेतलेले टिप्पर मधील विना परवाना ०६ ब्रास रेती किंमती ३०,०००/- असा एकूण ३०,३०,०००/- रू. चा माल जप्त करण्यात आला व गुन्हा दाखल करून तपासात घेतला सदर आरोपीतांना अटक करण्यात आले.
सदर प्रकरणी सरकारतर्फे फिर्यादी नामे पोलीस अंमलदार राहुल देविकर, पोस्टे कुही यांच्या रिपोर्टवरून पो. स्टे. कुही येथे आरोपीविरुध्द कलम ३७९, ३४ भादंवी सहकलम ४८(८), ४७ महा जमीन महसुल संहिता, सहकलम ४,२१ खाण आणी खनिज अधि, कायद्यान्वये गुन्हा नोंद केला आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोलीस हवालदार हरीदास चावरकर हे करीत आहे.
सदरची कार्यवाही ही पोलीस अभीक्षक हर्ष पोद्दार, अपर पोलीस अधिक्षक रमेश धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी उमरेड विभाग राजा पवार, पोस्टे कुही येथील ठाणेदार सपोनि अमितकुमार आत्राम, पोस्टे कुही पोलीस हवालदार हरीदास चाचरकर यांनी पार पाडली.