अल्पभूधारक तरुण शेतकऱ्याकऱ्याचा विहिरीत पडल्याने मृत्यु

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या आवंढी गावातील एका शेतमालकाच्या शेतात ठेका पद्धतीने शेती करणाऱ्या अल्पभूधारक तरुण शेतकऱ्याचा शेतातील विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज सायंकाळी पाच दरम्यान घडली असून मृतक तरुणाचे नाव कोमल लांभाडे वय 28 वर्षे रा आवंढी तालुका कामठी असे आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर मृतक हा अल्पभूधारक शेतकरी असून किसनाबाई मानमोडे यांच्या शेतात मागील ठेका पद्धतीने शेती करत असता आज सायंकाळी पाच दरम्यान सदर मृतक विहिरीत पडल्याची माहिती कळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह विहिरीबाहेर काढून पुढील उत्तरीय तपासणीसाठी शवविच्छेदनगृहात हलविण्यात आले.पोलिसांनी तुर्तास आकस्मिक मृत्यूची नोंद केली असली तरी आत्महत्या असावी असा तर्क लावण्यात येत आहे.मृतक हा अविवाहित असून मृतकाच्या पश्चात कुटुंबात आई वडील एक भाऊ व एक बहिण असा आप्तपरिवार आहे

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मुंबई विद्यापीठाचा वार्षिक दीक्षांत समारंभ, विकसित राष्ट्राच्या उभारणीत युवकांची भूमिका महत्वाची- राज्यपाल रमेश बैस

Thu Feb 8 , 2024
मुंबई :- विकसित राष्ट्राच्या उभारणीमध्ये युवकांची भूमिका महत्वाची असून विकसित भारताच्या संकल्पनेत युवकांना योगदान देता यावे, त्यांचा सक्रिय सहभाग वाढवा यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विकसित भारत@२०४७: Voice of Youth’ हा उपक्रम जाहीर केला आहे.असे राज्यपाल रमेश बैस यांनी सांगितले. मुंबई विद्यापीठाचा वार्षिक दीक्षांत समारंभ सोहळा राज्यपाल बैस यांच्या अध्यक्षतेखाली आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com