नागपुर :- दिनांक २६.०८.२०२४ रोजी नागपूर शहर पोलीसांनी पोलीस ठाणे हद्दीत महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये ०४ केस, तसेच एन.डी.पी.एस. कायद्यान्वये ०२ केसेस असे एकुण ०६ केसेसमध्ये एकुण ०७ ईसमावर कारवाई करून ३,६११/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
वाहतुक शाखा पोलीसांनी मोटार वाहन कायद्यान्वये विविध कलमांखाली एकूण ३.११८ वाहन चालकांवर कारवाई केली. एकूण रू. ३,३१,७५०/- तडजोड शुल्क वसूल केले आहे.
वरील सर्व मोहीम एकत्रितरित्या नागपूर शहर पोलीसांतर्फे राबविण्यात आल्या असून या पुढेही कारवाई प्रभावीपणे करण्यात येणार आहे. वाहन चालकांनी वाहन चालवितांना वाहनासंबंधी सर्व कागदपत्रे जवळ बाळगावित असे नागरीकांना आवाहन करण्यात येत आहे.