संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- ग्रामीण भागातील महिलांनी केंद्र व राज्य सरकारच्या विविध महत्त्वकांशी योजनेचा मोठ्या प्रमाणात लाभ घेऊन आत्मनिर्भर होण्याचे आवाहन नागपूर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष निशा सावरकर यांनी कामठी तालुक्यातील पवनगाव ग्रामपंचायत च्या वतीने आयोजित महिला मेळाव्यात मार्गदर्शन करताना व्यक्त केले पवनगाव- धारगाव गट ग्रामपंचायत च्या वतीने आयोजित महिला मेळाव्याचे उद्घाटन नागपूर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष निशा सावरकर यांचे हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी भाजप नागपूर जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष अनुराधा अमीन प्रदेश भाजप युवा मोर्चा पदाधिकारी अंजली कानफाडे, चित्रा निधान, नागपुर जिल्हा महिला आघाडी भाजप उपाध्यक्ष लतेश्वरी काळे ,कामठी तालुका भाजप महामंत्री मंगला कारेमोरे, तालुका भाजप महिला आघाडी अध्यक्ष प्रांजल वाघ, तरोडीच्या सरपंच आरती चीकटे ,पवनगावच्या सरपंच नेहा किरण राऊत ,कढोलीच्या माजी सरपंच,नानूताई ठाकरे उपस्थित होते.
महिला मेळाव्यात महिलांसाठी एकल व समूह नृत्य, समूहगीत, संगीत खुर्ची, पथनाट्याचे आयोजन करण्यात आले होते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा पाहुण्यांच्या हस्ते भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला कार्यक्रमात मार्गदर्शन करताना निशा सावरकर व अमीन अनुराधा अमीन म्हणाल्या ग्रामीण भागातील महिलांनी केंद्र सरकार व राज्य सरकारच्या विविध महत्त्वकांसी योजनांचा मोठ्या प्रमाणात लाभ घेऊन आत्मनिर्भर होण्याचे आवाहन केले कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन सरपंच नेहा किरण राऊत यांनी केले कार्यक्रमाला ग्रामीण भागातील महिला ,बचत गट व अंगणवाडी सेविका, मदतनीस मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.