अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास चार शंकराचार्यांचा विरोध, सोहळ्यास येणार नाही, कारण…

अयोध्या :- अयोध्येतील राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा येत्या २२ जानेवारीला होत आहे. २२ जानेवारीला रामलल्लाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा अयोध्येतील मंदिरात करण्यात येणार आहे. या सोहळ्यानिमित्त संपूर्ण देशात जल्लोष साजरा केला जाणार आहे. परंतु या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास चार शंकराचार्यांनी विरोध केला आहे. ते या सोहळ्यास येणार आहे. जगन्नाथ पुरीतील गोवर्धन पीठाचे जगद्गुरु शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती, उत्तराम्नाय ज्योतिष्पीठचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी अयोध्येतील सोहळ्यास आपण जाणार नसल्याचे स्पष्ट केले. स्वामी अविमुक्तेश्वरानंद आणि स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहण्यास नकार दिला आहे.

काय दिले कारण

स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी अयोध्येत न येण्याचे कारण माध्यमांशी बोलतांना सांगितले. ते म्हणाले की, चारही शंकराचार्य प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास येणार नाही. कारण मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले नाही. मंदिर पूर्ण होण्यापूर्वी प्राणप्रतिष्ठा करणे योग्य नाही. हा विधी शास्त्रोक्त नाही. ज्या ठिकाणी शास्त्रीय विधीचे पालन होत नसेल त्या ठिकाणी आम्ही जाणार नाहीत. समारंभात फक्त टाळी वाजवण्यासाठी आम्ही का जावे? हा समारंभ राजकीय आहे. सरकारने याचे राजकीयकरण केले आहे.

पश्चिमाम्नाय द्वारका शारदा पीठचे शंकराचार्य स्वामी सदानंद सरस्वती यांनी स्पष्ट काही सांगितले नाही. परंतु समारंभात येणार नसल्याचे स्पष्ट केले. दक्षिणाम्नाय श्रृंगेरी पीठाचे शंकराचार्य महा सन्निधानम स्वामी भारती तीर्थ यांनी या शुभ प्रसंगी देशवासियांनी शुभेच्छा देत समारंभाचा आनंद घेण्याचे आवाहन केले. स्वामी भारती तीर्थ आपला सोहळ्यास विरोध नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

रामटेकवर भाजपचा डोळा असल्याने शिंदे गटात अस्वस्थता

Fri Jan 12 , 2024
नागपूर :- अयोध्येत श्रीराम मंदिर उभारणीचे श्रेय घेणाऱ्या भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रातील श्रीरामाच्या रामटेकवरही दावा करणे सुरू केले आहे. शिंदे गटाचे खासदार असतानाही भाजपने ही जागा आपल्याला मिळावी यासाठी प्रयत्न सुरू केल्याने आगामी लोकसभा निवडणुकीत ही जागा शिंदे गट लढवणार की भाजपसाठी सोडणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. रामटेक हे विदर्भातील पौराणिक धार्मिक स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. त्याला आध्यात्मिक महत्त्वही […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com