नागपूर :- 51 वे जिल्हा स्तरीय विज्ञान प्रदर्शन 2023-24 मयून्सिपल हायस्कुल कळमेश्वर येथे आयोजित विज्ञान प्रदर्शनीत दिनांक 4जानेवारी ला जवाहर कन्या विद्यालय, सावनेर ने दुसरा क्रमांक पटकवित राज्यस्तर प्रदर्शनीत प्रवेश मिळवला आहे. शाळेतील विद्यार्थिनी भूमिका अनिल चौधरी हिने विज्ञान शिक्षक उमेश महाजन व विज्ञान शिक्षिका कांचन गोरले यांच्या मार्गदर्शनात ‘प्लास्टोस्कोप’ या प्रतिकृतीचे निर्माण केले. याबद्दल विद्याप्रसारक मंडळाचे सर्व पदाधिकारी व शाळेच्या मुख्याध्यापिकेने भूमिका व मार्गदर्शक शिक्षक शिक्षिकेचे कौतुक केले व राज्यस्तरीय प्रदर्शनी साठी शुभेच्छा दिल्या.
जवाहर कन्या विद्यालयाची राज्य स्तरावर निवड
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com