– पोलीस स्टेशन पारशिवनी ची कारवाई
पारशिवनी :- पोलीस स्टेशन पारशिवनी येथील स्टाफ पो.स्टे पारशिवनी परिसरात पेट्रोलिंग करीत असताना मुखबीरव्दारे माहीती मिळाली की, मौजा नवेगाव खैरी ते चारगाव रोडवर नवोदय विदयालय समोर एका ट्रॅक्टर ट्रॉली मध्ये अवैध्यरित्या विनापरवाना रेतीची चोरटी वाहतुक होत आहे, अशी खात्रीशिर खबर मिळाल्याने पोलीस स्टेशन पारशिवनी येथील स्टाफ यांनी मौजा नवेगाव खैरी ते चारगाव रोडवर नवोदय विदयालय समोर दिनांक २१/१२/२०२३ चे २३.४५ वा. ते दिनांक २२/१२/२०२३ चे ००.४० वाजता दरम्यान नाकाबंदी करीत असताना महिंद्रा ट्रॅक्टर क्र. एम. एच. २९/ए. डि- ८८१२ चा चालक आरोपी नामे- राजेश प्रभाकर शेंद्रे, वय २९ वर्ष, रा. बच्छेरा पेच पोस्टे नवेगाव खैरी ता. पारशिवनी हा आपले महिंद्रा ट्रॅक्टरला सलग्न विना नंवरची ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये अवैध्यरित्या विनापरवाना पेंच नदिपाशतुन वाळूचा उपसा करून गौण खनिज वाळुची चोरी करून वाहतुक करतांना मिळुन आल्याने नमुद आरोपीचे ताब्यातुन १) एक ब्रास रेती किंमती ४०००/- रू २) महींद्रा ट्रॅक्टर क्र. एम. एच.- २९/ ए डि-८८१२ किंमती ३,००,०००/- रू. ३) बिना नंबरवी ट्रॉली किंमती ५०,०००/- रु असा एकुण ३,५४,०००/- रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदर प्रकरणी सरकारतर्फे फिर्यादी नामे पोशि / राकेश बाबुलाल बंधाटे पोस्टे पारशिवनी यांचे रिपोर्टवरून पो.स्टे. पारशिवनी येथे आरोपी विरूद्ध कलम ३७९ भा. दं. वि. सहकलम ४८ (८) महा. जमीन महसूल संहीता १९६६ अन्वये गुन्हा दाखल असुन पुढील तपास एएसआय उके बोंद्र पोस्टे पारशिवनी हे करीत आहे.