– भाजपा वैद्यकीय आघाडीद्वारे आयोजन #५०० लाभार्थ्यांनी घेतला शिबिराचा लाभ …
नागपूर :- भारताचे माजी पंतप्रधान, भारतरत्न, श्रध्येय अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून आजपासून अटल सेवा सप्ताहनिमित्त आरोग्य शिबिराचे नागपुरात विविध ठिकाणी आयोजन करण्यात आले. आज आमदार कृष्णा खोपडे यांचे हस्ते श्री रमणा मारुती देवस्थान येथे आरोग्य शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी औपचारिक रित्या निःशुल्क मोतियाबींदू ऑपरेशन झालेल्या रुग्णांचा सन्मान करण्यात आला.याप्रसंगी विजय कैथे, प्रमोद् पेंडके, डॉ श्रीरंग वराडपांडे, डॉ राजेश रथकंठीवर, आदी पदाधिकारी डॉक्टर्स उपस्थित होते. या शिबिरात स्व.भानुताई गडकरी ग्रामीण विकास संस्थेद्वारे नागरिकांसाठी नेत्र, दंत, कर्ण , विविध रक्त तपासणी मोफत करण्यात आली , १०० हून अधिकांना अल्प दरात चष्मे वाटप करण्यात आले.
या शिबिरात फ्री SPO2, ब्लड शुगर तपासणी बीपी ,चेक अप आणि तज्ञ वैद्यांतर्फे निशुल्क आरोग्य रोगनिदान करण्यात आले शिबिराचे आयोजन होमिओतज्ञ डॉ सुमित पॅडेलवॉर यांचे द्वारे करण्यात आले. ५०० हून अधिक नागरिकांनी यात सहभाग घेतला. शिबिराच्या यशस्वितेसाठी डॉ गिरीश चर्डे, डॉ प्रांजल मोरघडे, डॉ अजय सारंगपुरे, राकेश काँटमवार, आदिनी सहकार्य केले.