संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- नागपूर जिल्ह्यातील बाजारगाव परिसरातील सोलर एक्स्पोसिव्ह कंपनीतील स्फोटाची घटना अत्यंत दुर्दैवी असून यात मृत्युमुखी पडलेल्यांना माजी राज्यमंत्री ऍड सुलेखा कुंभारे यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. तसेच मृतांच्या कुटुंबीयांप्रति सहवेदना व्यक्त केल्या आहेत.
ऍड सुलेखा कुंभारे यांनी प्रसिद्धी पत्रकातून व्यक्त केले की, बाजारगाव येथील स्फोटाची दुर्घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या स्फोटाची सखोल चौकशी करीत दोषींवर कारवाही करून मृतकाच्या कुटुंबियांना तसेच जख्मिना न्याय देण्यात यावा तसेच . या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली अर्पण करीत मृतांच्या कुटुंबीयांप्रति सहवेदना व्यक्त केल्या आहेत.