कुही :-पोलीस अधिक्षक नागपूर ग्रामीण यांचे आदेशाने दिनांक १३/१२/२०२३ रोजी बडद पारधी बेळा येथे मोहाफुल गावठी दारू गाळणान्या इसमावर कारवाई करण्यात आली अवैध्यरित्या मोहाफुल गावठी दारू काढणारा १ पुरूष नामे अरूण उर्फ गुडडु रामुजी कुहीकर वय ४३ वर्ष, रा. सालई गोधनी ता. उमरेड जि. नागपूर हा पारधी वेळा जंगल शिवारात मोहाफुल सडवा रसायन बाळगुन मोहाफुलाची गावठी दारूची रनिंग भट्टी काढतांना मिळून आला. घटनास्थळावरून मोहाफुल सडवा रसायन १४०० लिटर सडवा रसायन २०/- रु लिटर याप्रमाणे २८,०००/- रु चा माल, २० लिटर मोहाफुल गावठी दारू प्रती लिटर किंमती ५०/-रु याप्रमाणे एकुण १०००/-रू तसेच लहान एकुण ७ इम प्रती किंमती ५००/- रु याप्रमाणे एकूण ३,५००/- रु असा एकूण ३२,५००/- रु चा मुद्देमाल मिळुन आल्याने मोक्यावर पंचनामा कारवाई करून नष्ट करण्यात आला. १ पुरुष आरोपी विरुध्द पोस्टे कुही येथे कलम ६५ (ई), (फ) महाराष्ट्र दारूबंदी कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सदरची कारवाई ही मा. पोलीस अधिक्षक नागपूर ग्रामीण श्री. हर्ष ए. पोद्दार (भा. पो. से.), अपर पोलीस अधिक्षक डॉ. संदीप पखाले यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक महेश भोरटेकर पोलीस स्टेशन कुही, पोलीस हवालदार दिलीप लांजेवार, चांगदेव कुथे, पोलीस अंमलदार पंकज बुटले, आशिष खंडाईत यांनी संयुक्तरित्या पार पाडली.