कामठी :- महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास इतरांना कळावा या उद्देशाने दरवर्षी युवा चेतना मंच तर्फे रनाळा येथे शिवकालीन किल्ला तयार करण्यात येतो. युवा चेतना मंच चे प्रा पराग सपाटे हे त्यांच्या घरी आदर्श नगर येथे शिवकालीन किल्ल्याची प्रतिकृती तयार करीत असतात. प्रा पराग सपाटे मागील दहा बारा वर्षा पासून खंड न पडू देता आपल्या घरी शिवकालीन किल्ला तयार करत असतात. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते शिवकालीन किल्ल्याची विधीवत पुजन करण्यात येते. यावर्षी कामठी निधी अर्बन बैंक चे संचालक नितीन ठाकरे, ग्रामपंचायत सदस्य प्रदीप सपाटे, दिंव्याग फाऊंडेशनचे सचिव बाँबी महेंद्र , जेष्ठ नागरिक संघटनेचे गणेश सपाटे, नरेंद्र कुथे, तुकाराम ठवकर , दशरथ देशमुख, सचिन देशमुख यांच्या हस्ते किल्ल्याची विधिवत पुजन करून,शिवस्तुती घेऊन किल्ले प्रदर्शनी ची सुरुवात करण्यात आली.
किल्ला तयार करण्याकरीता भावना सपाटे, प्रथम सपाटे, स्वरीत सपाटे, अक्षय खोपे , अमोल नागपुरे यांनी अथक मेहनत घेतली. लहान मुलांना महाराजांचा इतिहास कळावा महाराजांच्या गड-किल्ल्यांची माहिती व्हावी ,स्वराज ची माहिती व्हावी या उद्देशानेच हे किल्ले तयार करण्यात येते .बालक हे किल्ले तयार करताना महाराजांचा इतिहास समजून घेण्याचा मनःपूर्वक प्रयत्न करतात याच उद्देशाने या किल्ल्यांची निर्मिती दरवर्षी युवा चेतना मंच करत असते परिसरातील बालकांनी मोठ्या उत्साहाने या किल्ला निर्मितीत सहकार्य केले . ह्या किल्ल्याला बघण्याकरीता परिसरातील बालकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली. याप्रसंगी अक्षय खोपे यांनी बालकांना शिवाजी महाराजांचा इतिहासावर माहिती प्रदान केली.याप्रसंगी युवा चेतना मंच चे शिवउत्सव प्रमुख मयूर गुरव, सहप्रमुख कुणाल सोंलकी, भुषण ढोमण, डॉ निखिल अग्निहोत्री, आदी याप्रसंगी उपस्थित होते .