नागपूर :- दिनांक ०९.११.२०२३ चे १९.०० वा. चे सुमारास गुन्हेशाखा युनिट चे अधिकारी व अंमलदार यांना मिळालेल्या खात्रीशीर माहिती वरून त्यांनी पोलीस ठाणे लकडगंज हद्दीत, हिरा पान पॅलेस सतनामी चौक, लकडगंज येथे रेड कारवाई केली असता आरोपी अनिल मनोहरलाल घोसेवान वय ४३ वर्ष रा. लॉ नं. ११ भवानी मंदीर जवळ पारडी, नागपुर यांचे ताब्यातून शासनाने प्रतीबंधीत केलेला सुंगधीत तंबाखु, व तांबाकुजन्य पदार्थ व वेगवेगळा फ्लेवरचे तंबाखु ईत्यादी साहित्य मिळून आले. आरोपीचे ताब्यातून नमुद मुद्देमाल एकूण किमती अंदाजे १,०५,३२२/- रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीविरूध्द पोलीस ठाणे लकडगंज येथे कलम १८८, २७२, २७३, ३२८ भा.द.वी सहकलम ५९ अन्न व सुरक्षा मानके अधिनीयम अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीला मुद्देमालासह लकडगंज पोलीसांचे ताब्यात दिले आहे.
वरील कामगिरी अपर पोलीस आयुक्त गुन्हे शाखा, पोलीस उप-आयुक्त (डिटेक्शन) यांचे मार्गदर्शना खाली पोनि मुकुंद ठाकरे, पोउपनि मधुकर काटोके, सफ दशरथ मिश्रा, संतोष पंडि पोहवा विजय श्रीवास, संतोषसिंह ठाकुर, पोअ जितेश रेड्डी, दिपक दासरवार, दिपक लाकडे, विशाल रोकडे यांनी केली.