संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कन्हान :- पोलीस स्टेशन अंतर्गत हायवे रोडवर टेकाडी पुला जवळ येणाऱ्या आयसर वाहनाला एका एक गाय आडवी आल्याने वाहन उजव्या बाजुला घेतले असता उभा असलेल्या कोळसा ट्रक ला मागुन जोरदार धडक लागल्याने झालेल्या अपघातात वाहन चालकाचा मृत्यु तर किलींअर जख्मी झाला.
प्राप्त माहितीनुसार रविवार (दि.५) नोव्हेंबर ला रात्री १.३० वाजता दरम्यान आयसर गाडी क्र.एम एच.१९.सीवाय. ६०११ ही कुरीअर पार्सल भरून नागपुर वरून बालाघाट येथे जात असतांना हायवे रोड वर टेकाडी पुलाजवळ अचानक एक गाय रोडवर आल्याने तिच्या बचावाकरिता आयसर वाहन चालका ने आपल्या ताब्यातील वाहन उजव्या साईडला वळवि ले असता समोर विना रिफलेक्टर, विना पार्किंग लाईट , विना इंन्डीकेटर उभा असलेला कोळसा ट्रक क्र.एम एच.४०.बिजी. ६६६१ ला मागुन जोरदार धडक लागल्याने आयसर वाहन चालक कुनाल टेंभुर्ने हा गंभीर जख्मी व कंन्डक्टर प्रेम मेश्राम हा किरकोळ जख्मी झाला. सदर घटनेची माहिती कन्हान पोलीसांना मिळताच पोलीसांनी घटनास्थळी पोहचुन पंचनामा करुन दोन्ही जख्मींना उपचाराकरिता खाजगी रुग्णालयात नेले असता उपचारा दरम्यान आयसर गाडी चालक कुनाल टेंभुर्ने चा मृत्यु झाला. कन्हान पोलीसांनी फिर्यादी प्रेम मेश्राम यांचा तक्रारी आरोपी ट्रक क्र. एमएच ४०.बिजी.६६६१ चा चालका विरुध्द अप क्र ६९१/२३ कलम २७९ , ३३७ , ३०४(अ) सहकलम १३४/१७७ अ,ब १८७ मोवाका अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरिक्षक सार्थक नेहेते यांचा मार्गदर्शनात सहायक पोलीस निरिक्षक पराग फुलझले,पो हवा जयलाल सहारे, शिपाई कोमल खैरे हे करित आहे.