– ब्लू बर्ड्स या संघटनेतर्फे लाखों अनुयायांना व्यवसाय व रोजगार मार्गदर्शन यशस्वी
नागपूर :- ६७ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दिक्षाभूमीवर येणाऱ्या लाखों अनुयायांना व्यवसाय व रोजगार मार्गदर्शन करण्यासाठी प्रत्येक वर्षीप्रमाणे याही वर्षी ब्लू बर्डस या व्यवसाय व सामाजिक संघटनेकडून स्टाल लावण्यात आला. या वर्षात ब्लू बर्ड्स या संघटनेतर्फे बनविण्यात आलेला ब्लू बर्ड्स हा बुध्दिस्ट बिजनेस अप चर्चेचा विषय ठरला. ६ हजार अनुयायांनी स्टाल वर भेट देवून अप बद्दल जाणून घेतले व अप डॉऊनलोड केला. ६२५ बुध्दिस्ट व्यवसाय अप वर रजिस्टर्ड करण्यात आले. संघटनेद्वारे वेगवेगळ्या शासकिय योजनांची माहिती व वेगवेगळ्या उद्योगांची माहिती दिक्षाभूमीवर येणाऱ्या अनुयायांना देण्यात आली. संघटनेद्वारे या वर्षी “टॉप बुध्दिस्ट बिजनेस मॅगझिन” या व्यवसाय माहिती पुस्तिकाचे प्रकाशन समाज कल्याण विभागीय उपायुक्त डॉ. सिध्दार्थ गायकवाड तसेच एम सी ई डी प्रमुख हेमंत वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आले. समाजातील व्यवसायिकांची समाजाला माहिती व्हावी याकरिता या मॅगझिनच्या १० हजार प्रती दिक्षाभूमीवर निःशुल्क वितरीत करण्यात आल्या. संघटनेद्वारे व्यवसायिकांना काही प्रेरणादायी पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. “बेस्ट बुध्दिस्ट बिजनेसमॅन” पुरस्कार डॅडी कलेक्शन चे दर्शन रंगारी या गारमेंट व्यवसायिकांने पटकाविला. “बेस्ट सोशल बिजनेसमॅन” हा मानाचा पुरस्कार व्यवसाय करतांना देखील समाजाच्या चळवळीत नेहमी सहभागी असणारे सुकिती बिल्डर्स अण्ड डेव्हलपर्स चे राहूल जारोंडे यांना देण्यात आला. बेस्ट न्यू कमर बिजनेसमॅन” चा पुरस्कार लालाजी जिमचे अभिषेक साखरे यांना देण्यात आला. तर बेस्ट ऊमन इंटनप्रिनर हा पुरस्कार तथागत सुपर मार्केट च्या हर्षा जामगडे यांना देण्यात आला. सेंट्रल मॉल समोर प्रत्येक वर्षीप्रमाणे संघटनेकडून १० हजार लोकांना भोजनदान करण्यात आले. कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता संघटनेचे पदाधिकारी रणजित फुले, मिथिलेश पाटील, शैलेष खडसे, सुनित खातरकर, विवेक सोनुले, विजय मेश्राम, विजय इंगळे, ओमकार भास्कर पवन खोब्रागडे, व अंकित रामटेके यांनी परिश्रम घेतलेत.