नागपूर :- आरोग्य विभाग जिल्हापरिषद नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे आयुष्यमान भारत अभियानार्तंगत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, महात्मा फुले जनआरोग्य योजने अंतर्गत येणाऱ्या योजनांची माहिती कार्यशाळेमध्ये उपस्थितांना देण्यात आली. या योजने अंतर्गत आयुष्यमान कार्ड स्वत: बनविण्याची कार्यपध्दती या विषयांची माहिती देण्यात आली.
सार्वजनिक वितरण प्रणालीव्दारे या योजनेतील लाभार्थी शोधून त्यांना कार्डचे वाटप करण्यात येणार आहे.कोणत्याही लाभार्थ्यांना घरी बसून आपले आयुष्यमान कार्ड तयार करू शकतो. गुगल प्ले स्टोर वरून आयुष्यमान अपलोड करून किंवा https;//beneficiary.nha.gov.in अपलोड करावा किंवा अधिक माहिती साठी 1800111565 या टोल फ्री क्रंमाकावर संपर्क साधावा असे यावेळी सांगण्यात आले.
बैठकीला अन्न धान्य वितरण अधिकारी भास्कर तायडे, एम.जे.पी.ओजे.ए.वाय क्षेत्रीय अधिकारी फनिंद्र चंदा,महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ.अनूप बुराडे, डॉ.ईनामदार यांची उपस्थिती होती.