भिवापूर :– अंतर्गत २२ किमी अंतरावर मौजा नांद ता. भिवापुर जि. नागपूर येथे दिनांक १४/१०/२०२३ मे २३.३० वा. ते २३.४५ वा. दरम्यान यातील मृतक दिनेश सुरेश चाचेरकर, वय ३५ वर्षे रा. नांद ता. भिवापूर जि. नागपूर हे आपल्या चुलत भावासह नांद येथील प्रयागयास बार येथे दारू पिण्यास गेले असता तिथे आरोपीचा मोठा भाऊ सुरज बुटे हा सुध्दा दारू पिण्यास आला होता, तेव्हा सुरज चुटे याने दिनेश याच्या अंगावर विनाकारण पाणी टाकल्याने दिनेश याने त्यास हटकले व त्याला धक्का दिला. त्यामुळे सुरज हा खाली पडला. त्यानंतर काही वेळाने दिनेश व त्याचा भाऊ फिर्यादी विष्णु चाचेरकर हे घरी गेले, घरी जेवन करून रात्री २३.३० वा. ते २३. ४५ वा. दरम्यान फिर्यादी हा त्याचा भाऊ दिनेश यांचेसह व रूपेश हिवरकर असे मिळुन गावातील हनुमान चौकात देवीचे डेकोरेशन बाबत चर्चा करत बसले असता तेवढयात सुरज चुटेचा लहान भाऊ आरोपी नामे चेतन कवडुजी चुटे वय २५ वर्षे, रा. नोंद ता. भिवापुर जि. नागपूर हा तिथे मोटार सायकलने आला व त्याने दिनेशला भाऊ काय झाले तु माझ्या भावाला का मारले असे म्हटले असता दिनेशने म्हटले कि उदया सकाळी तुझ्या भावाला घेवुन ये मग सांगतो, असे म्हटले असता आरोपी चेतन चुटे याने अचानक त्याच्याजवळ लपवून आणलेला चाकु काढुन दिनेशच्या चेहrयावर, पोटावर, चाकुने सपासप वार केल्यामुळे दिनेश जमीनीवर खाली पडला व त्याच वेळी आरोपी चेतन चुटे हा तिथुन पळून गेला. फिर्यादीने दिनेशला उचलून लोकांच्या मदतीने सरकारी दवाखाना नांद येथे नेले, तेथे उपचार करून डॉक्टरांनी रेफर केल्याने त्यास नागपुर येथे नेत असता उमरेड येथे रस्त्यात मरण पावल्याने त्याला ग्रामीण रूग्णालय उमरेड येथे नेले असता तेथील डॉक्टरांनी दिनेशला तपासुन मृत घोषीत केले.
सदर प्रकरणी फिर्यादी यांचे रिपोर्ट वरून पो.स्टे. भिवापूर येथे आरोपीविरुद्ध कलम ३०२ भा.द.वी अन्वये गुन्हा नोंद केला आहे. यातील आरोपीला अटक करण्यात आली असुन गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप सडमेक हे करीत आहे.