नागपूर :- भिमशक्ती सामाजीक संघटनेचा कार्यकर्ता मेळावा रविभवन नागपूर येथे संघनेचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत हंडोरे माजी सामाजीक न्यायमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेत संपन्न झाला. या मेळाव्यात मध्ये 67 वा धम्मचक्र अनुवतन दिना निमित्त 23 ऑक्टोबर 2023 ला डॉ. वसंतराव देशपांडे सभागृह नागपूर येथे राज्यस्तरीय भव्य आधीवेशनाचे आयोजन करण्यात आले या मेळाव्यात संघटनेचे कार्याध्यक्ष अशोक दिवे, माजी महापौर नाशिक नामदेवराव पिवळे, राज्यउपाध्यक्ष कैवलदास रायपूरे राज्य उपाध्यक्ष कैलास सुखदाने, राज्य सरचिटणीस, विदर्भ अध्यक्ष पंकज मेश्राम, पूर्व विदर्भ अध्यक्ष रोशन जांभुळकर, समाजसेवी व पत्रकार मिलींद खैरकर, पश्चिम विदर्भ अध्यक्ष दिलीप भोजराज, जिल्हाध्यक्ष कैलास बोरकर, शहराध्यक्ष हंसराज मेश्राम, महिला आघाडीच्या श्रीमती प्रिया जांभुळकर, जिल्हाध्यक्षा सविता होले यांनी मार्गदर्शन केले. या मेळाव्यात विदर्भातील सर्व जिल्हाध्यक्ष उपस्थित होते कार्यक्रमात सुधा जैन, सुनिता रंगारी, रत्ना बोरकर, नरेंद्र जैन, गंगाधर मेश्राम, गजानन नानवटकर, नंदु पाटील, प्रविण बागडे, अनिल जोगे, उपस्थित होते. अब्दुल रफीक सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
भिमशक्तीचा कार्यकर्ता मेळावा रविभवनात संपन्न,येत्या 23 ऑक्टोबरला राज्यस्तरीय भव्य अधिवेशन – चंद्रकांत हंडोरे
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com