नागपूर :- “घटस्थापना” निमित्त रविवार १५ ऑक्टोंबर रोजी शहरातील कत्तलखाने तसेच मांस विक्रीचे दुकाने बंद राहणार आहेत. यासंदर्भात घनकचरा व्यवस्थापन विभाग संचालक तथा उपायुक्त डॉ. गजेंद्र महल्ले यांनी आदेश निर्गमित केले आहेत.
उपायुक्तांच्या आदेशानुसार, रविवार दिनांक १५ ऑक्टोबर रोजी “घटस्थापना” दिना निमित्त नागपूर महानगरपालिका हद्दीतील सर्व कत्तलखाने व मांस विक्रीची दुकाने बंद राहतील. जे या आदेशाचे उल्लंघन करतील त्यांच्यावर महानगरपालिकेच्या भरारी पथकाद्वारे कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.