संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या उंटखाना परिसर रहिवासी 17 वर्षीय मुली सोबत लग्न करण्याची बळजबरी करून तिला अश्लील शिवीगाळ देत तिच्या आईला मारझोड करून जीवे मारण्याची धमकी देण्याची घटना गतरात्री 8 दरम्यान उंटखाना येथे घडली असून यासंदर्भात पीडित तरुणीने स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारिवरून आरोपी रजीक खान रियाज खान वय 22 वर्षे रा उंटखाना कामठी विरुद्ध भादवी कलम 294,506 (बी)323,354(डी),336,341 सहकलम 11(4)पोक्सो कायद्यांनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर पीडित तरुणी व आरोपी एकाच वस्तीत शेजारी राहत असून एकमेकांशी चांगलेच परिचित असून इन्सट्राग्रामवर बोलणे सुद्धा सुरू होते मात्र मधातच दोघात झालेल्या मतभेदातून बोलणे बंद झाल्यामुळे सदर आरोपी तरुणाने पीडित तरुणीचा पाठलाग करून सोबत व लग्न करण्याची बळजबरी केली व माझ्यासोबत लग्न न केल्यास कुनालाच सोडणार नाही अशी धमकी देत सदर घटनास्थळी तारीख व वेळी फिर्यादी तरुणी व तिच्या आईला लाथभुक्कीने मारहाण केली यासंदर्भात आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सूरु आहे.