संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 4:-स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या येरखेड्यात फिर्यादी हे आपल्या मित्रांसोबत बोलत असताना आरोपीने आज एक को देखना है असे बोलून फिर्यादीच्या डोक्यावर व नाकावर लाकडी राफटर ने मारून जख्मि केल्याची घटना सायंकाळी सहा दरम्यान घडली असून यासंदर्भात जख्मि फिर्यादी तोसलाल साहू वय 55 वर्षे रा सदाशिव नगर ने स्थानिक पोलिस स्टेशन ला दिलेल्या तक्रारी वरून आरोपी सतीश जागडे वय 35 वर्षे रा राजुमडी मोहल्ला कामठी विरुद्ध भादवी कलम 324 अनव्ये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.