– प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजने अंतर्गत आयोजन
नागपूर :- नागपूर महानगरपालिका हद्दीतील शाळांमध्ये कार्यरत स्वयंपाकी मदतनीस, पालक व शिक्षक यांच्याकरिता आयोजित पाककृती स्पर्धेला स्पर्धकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला. प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजने अंतर्गत सोमवार (ता. २५) रोजी सिव्हील लाईन्स स्थित सेंट उर्सुला गर्ल्स हायस्कूल येथे पाककृती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजने अंतर्गत ‘सप्टेंबर महिना पोषण आहार म्हणून साजरा करण्यात येत आहे. याअंतर्गत मनपाद्वारे पाककृती स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेत शाळेतील स्वयंपाकी मदतनीस यांच्यातर्फे उत्कृष्ठ पध्दतीने वेगवेगळे पदार्थ तयार करण्यात आले. पदार्थामध्ये तृणधान्य, हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करण्यात आला. त्याचप्रमाणे पदार्थामधील विद्यार्थ्यांना आवश्यक पोषण कार्बोदके, प्रथिने, जीवनसत्वांन विषयी माहिती देण्यात आली.
पाककृती स्पर्धेकरिता मनपाच्या शिक्षणाधिकारी साधना सयाम, जिल्हा परिषदच्या शिक्षणाधिकारी (प्राथ.) रोहिणी कुंभारे यांनी प्रोत्साहन दिले. तसेच पाककृती स्पर्धेकरीता आहारतज्ज्ञ प्रा. मनिषा सावरकर, आहारतज्ज्ञ प्रा. चौधरी, आरोग्य अधिकारी दिपाली नागरे यांचे प्रतिनिधी व पळसकर यांनी स्पर्धेच्या परिक्षकाची भुमिका बजावली. मनपाच्या प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना अधीक्षक नयना दळवी यांनी विद्यार्थ्यांना उत्कृष्ट, चविष्ट संतुलित आहार देण्याबाबत पाककृती स्पर्धेच्या माध्यमातून शाळा स्तरावरील स्वंयपाकी मादतीस शिक्षक यांना मार्गदर्शन केले.
पाककृती स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक सेंट उर्सुला शाळेतील स्वयंपाकी नंदा वडडेवार व्दितीय क्रमांक प्रोव्हीडंस गर्ल्स हायस्कुलच्या स्वयपांकी स्मिता भुल, तृतीय क्रमांक प्रशांत उच्च प्राथमिक शाळेच्या स्वयंपाकी संगिता जाधव यांनी पटकावला. स्पर्धेत प्रथम क्रमांकाला 5000/- रु, व्दितीय क्रमांकाला 3500/- रु. व तृतीय क्रमांकाला 2500/- रु. रोख बक्षीसजाहीर करण्यात आले. त्याचप्रमाणे सर्व स्वयपांकी मदतनीस, शिक्षक व पालक यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाचे संचालन सेंट उर्सुला शाळेच्या शिक्षिका कपले व आभार प्रदर्शन विशाल यांनी केले. नयना दळवी, अधिक्षक, प्रपोशनियो तसेच त्यांच्या टिमतर्फे अंतराष्ट्रीय तृणधान्य वर्ष असल्याने तृणधाण्यावर आधारीत पाककृती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.