उप पो.स्टे जिमलगट्टा पोलीसांनी केला 1,75,000/- रुपयांचा मुद्देमाल जप्त

गडचिरोली :-आगामी गणेशोत्सवाच्या अनुषंगाने गडचिरोली जिल्ह्रात दारुबंदी असतांना अवैधरीत्या छुप्या रीतीने दारु विक्री व वाहतुक केली जाते. त्याविरुध्द पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांचे अवैद्य दारु विक्रीवर अंकुश लावण्याबाबत मिळालेल्या आदेशान्वये काल दिनांक 17/09/2023 रोजी गोपनिय बातमीदाराकडुन माहिती मिळाली की, नामे आदेश सत्यप्रकाश यादव रा. जिमलगट्टा तसेच त्याचा भाऊ रामनरेश साहेबसिंग यादव हे दोघे मौजा तुमलबोडी (किष्टापूर टोला) येथील बक्का बोडका तलांडी याचे घरी अवैधरित्या विना परवाना मोठया प्रमाणात रॉकेट देशी दारु चे साठा करुन वेगवेगळे दारु विक्रेते याना व चिल्लर विक्री करीता साठवून ठेवली आहे. अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी सुजीतकुमार क्षीरसागर , उप पोस्टे जिमलगट्टा प्रभारी अधिकारी सपोनि संगमेश्र्वर बिरादार व पोलीस स्टाफ यांनी पंचांसह मौजा तुमलबोडी (किष्टापूर टोला) येथे राहत असलेल्या बक्का बोडका तलांडी यांचे घरी जावुन आवाज दिला असता एक म्हातारा व्यक्ती घराबाहेर येताच त्याला त्याचे घरी येण्या मागचे कारण सांगुन आप आपली अंगझडती देवुन घरात प्रवेश केला. घरात दक्षिण कोप­यात मोठया प्रमाणात कागदी काटुन बॉक्स आढळुन आले. त्यानंतर कागदी काटुन बॉक्स उघडुन पाहिले असता, त्यात रॉकेट देशी दारु संत्रा 90 एम.एल. क्षमता असलेले मद्याने भरलेले सिल बंद प्लास्टिक बॉटल आढळुन आले. एका कागदी काटुन बॉक्समध्ये 100 नग सिल बंद प्लास्टिक बॉटल याप्रमाणे 50 कागदी काटुनमध्ये 5000 नग सिल बंद प्लास्टीक बॉटल असुन प्रती नग 35/- रु. प्रमाणे 1,75,000/- रु. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर मुद्देमालाबाबत तलांडी यांच्याकडे विचारणा केली असता, सदरील अवैध दारुचा साठा 1) आदेश सत्यप्रकाश यादव, 2) रामनरेश साहेबसिंग यादव व 3) मनोज मुजुमदार यांनी विक्री करीता माझ्याकडे साठवुन ठेवले असल्याचे सांगीतले. यावरुन आरोपींचा गावात शोध घेतला असता, आरोपी नामे रामनरेश यादव हा मिळुन आला असून आरोपी आदेश यादव हा पळुन जाण्यात यशस्वी झाला. सदर गुन्ह्राचा पुढील तपास वरीष्ठाचे मार्गदर्शनाखाली परि.पोउपनि. ज्ञानेश्वर कोल्हे हे करत आहेत.

सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक अहेरी यतिश देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी जिमलगट्टा सुजितकुमार क्षिरसागर यांचे नेतृत्वात जिमलगट्टा प्रभारी अधिकारी सपोनि. संगमेश्वर बिरादार पोउपनि. आनंद गिरे व पोलीस अंमलदार यांनी पार पाडली.

तसेच यावेळी पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी जिल्ह्रातील नागरीकांना आवाहन केले की, जिल्ह्रात कुठेही अशा पद्धतीने होत असलेल्या अवैध दारु अथवा तत्सम अंमली पदार्थाच्या वाहतुकीबद्दल माहिती मिळताच गडचिरोली पोलीस दलाशी संपर्क साधावा.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

ताड़मेटला हत्याकांड के दोषियों को करो गिरफ्तार - किसान सभा

Mon Sep 18 , 2023
रायपुर :- अखिल भारतीय किसान सभा से संबद्ध छत्तीसगढ़ किसान सभा ने पुलिस द्वारा ताड़मेटला में नक्सली मुठभेड़ के नाम पर दो आदिवासी युवकों की हत्या की कड़ी निंदा की है और दोषी पुलिस अधिकारियों को गिरफ्तार करने तथा पीड़ित परिवारों को एक-एक करोड़ रुपये मुआवजा देने की मांग की है। किसान सभा ने इस पूरे घटनाक्रम पर राज्य सरकार […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!