कामठी शहर शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) तर्फे नेत्ररोग तपासणी शिबिर संपन्न

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- येथील भिक्कमसिंग चौक यादवनगर,प्रभाग क्रमांक १४ येथे नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर, बाळासाहेब ठाकरे यांचे प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.तसेच शिबिराकरीता आलेले डॉ. अरविंद डोंगरवार, डॉ.गौरव चन्ने, डॉ.भाष्कर हेडाऊ, डॉ.साहेबा शेख यांचे स्वागत नागपूर जिल्हा संघटकप्रमुख राधेश्याम हटवार, शहरप्रमुख मुकेश यादव,भाविसे उपजिल्हाप्रमुख विनोद यादव, कामगार सेनेचे सुंदरसिंग रावत यांनी केले. सकाळी १०ते दुपारी ४ वाजेपर्यंत चाललेल्या या उपक्रमात सहभागी ४०० रुग्नांनी आपले नेत्र तपासणी करून घेतली.महात्मे नेत्र तपासणी व पतपेढी नागपूर यांच्या सहकार्याने चिकित्सक चमुंनी नेत्र तपासणी शिबिरातुन ७० रुग्णांना मोतीयाबिंदु शस्त्रक्रीया उपचार करण्यासाठी दिनांक व वेळ दिली असुन हि शस्त्रक्रीया मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच २०० रुग्णांना तपासणीत चष्मे नंबर देण्यात आले.तर अन्य तपासणी करणाऱ्यांना नेत्ररोग औषधी उपयोग करण्याचा सल्ला देण्यात आला. सर्वत्र डोळ्यांची साथ सुरु असुन या साथीत डोळ्यांची काळजी घेण्याचे आवाहन यावेळेस उपस्थितांना मार्गदर्शन प्रसंगी करण्यात आले. लवकरच नंबर मिळालेल्या शिबिरार्थींना त्यांचे चष्मे वाटप मोफत करण्यात येणार आहेत.तसेच मोतीयाबिंदु शस्त्रक्रीया उपचारासाठी रूग्णांना मदत केली जाणार आहे.

या शिबिराचे आयोजन सफल करण्यात शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) निहालसिंग चौधरी,मुन्ना प्रजापती, महेश तालेवार, सुरज दास, शिव यादव,कमल सकतेल,रीतेश केझरकर,कुलदिप वासनीक, आकाश टेंबुर्णे,प्रशांत गजभिये, जीवन रामटेके, संदेश सरोजकार,विजेन्द्र गजभिये, नरेश यादव, खुशाल कश्यप,प्रमोदजी टेंभुर्णे,विक्की यादव,अजय (लख्खु) यादव यांनी सहकार्य केले.याप्रसंगी शहर प्रमुख मुकेश यादव यांच्या जन्मदिनाच्या उपस्थितांनी यश व दिर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सालासर बालाजी के अनेक भक्तों ने किये दर्शन

Wed Aug 23 , 2023
– राधाकृष्ण मंदिर में सावन झूला उत्सव जारी – आज बनेगी गणेश टेकड़ी व अष्ट विनायक की झांकी नागपूर :- श्री राधाकृष्ण मंदिर, वर्धमान नगर में सावन झूला उत्सव जारी है। मंगलवार को सालासर बालाजी की भव्य अद्भुत झांकी दर्शन के लिए निर्मित की गई| दर्शनार्थियों की भीड़ ने बालाजी की झांकी की सराहना की |मंदिर में शिवजी का मनमोहक […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!