– झेन मास्टर डॉ लिम सीओव्ह जीन (मलेशिया) आणि आयुर्वेद तज् डॉ राजेश सवेरा (पुणे) यांच्या मार्गदर्शनात एक दिवसीय ध्यान सम्मेलन
नागपूर :- सुन्यती इंटरनॅशनल फाऊंडेशन (SIF) या अंतरराष्ट्रीय संस्थेने शांतता आणि समृद्धीला प्रोत्साहन देण्यासाठी नागपूर शहरातील 500 हून अधिक लोकांसाठी रविवार, 27 ऑगस्ट 2023 रोजी चायना टाऊन हॉल, लांबा सेलिब्रेशन, भिलगाव, कामठी रोड नागपूर येथे एक दिवसीय मेगा मेडिटेशन रिट्रीटचे आयोजन केले आहे.
गेल्या वर्षभरापासून नागपूरच्या नागलोक येथे दर महिन्याला तीन दिवसीय निवासी रिट्रीटचे आयोजन नियमितपणे केले जाते. हा कार्यक्रम 12 शिबीर यशस्वीपणे पूर्ण झाल्या निमित्ताने एक विशेष आयोजन असेल सुन्यती निवासी शिबिरांची प्रवेश मर्यादा आणि वाढती मागणी लक्षात घेऊन फाऊंडेशनने सर्वांसाठी एक दिवसीय रिट्रीट चे आयोजन केले आहे. सुन्यती फाउंडेशन शाळा, महाविद्यालये, कॉर्पोरेट संस्था, सरकारी आणि गैर-सरकारी संस्था इत्यादींना प्रशिक्षण देते.
आचार्य नागजीव या नावाने प्रसिद्ध असलेले झेन मास्टर डॉ. लिम सीओव्ह जिन (मलेशिया) आणि जगप्रसिद्ध आयुर्वेद चिकित्सक, मानसोपचारतज्ज्ञ आणि पुणे येथील सुन्य प्रवर्तक डॉ. राजेश सवेरा यांच्या मार्गदर्शनाने हा कार्यक्रम होणार आहे. सुन्य समता विपश्यनेचि साधना जगभरात केली जाते, या सोबतच सुन्यती फाउंडेशन सामाजिक उत्थानासाठी अनेक औद्योगिक उपक्रम सुद्धा राबविते. नागपूर परिसरात काही औद्योगिक उपक्रम स्थापन करण्याचा मानस डॉ लिम डॉ सवेरा यांनी या पूर्वी व्यक्त केला आहे.
“पंचशील आणि हृदय सूत्र – थीम रिट्रीट” ची सुरुवात मूलभूत सुन्य समता विपश्यना साधनेने होईल आणि त्यानंतर डॉ. राजेश सवेरा आणि डॉ. लिम सीजोव्ह जिन यांचे प्रवचन होईल. ज्यांना उपस्थित राहण्याची इच्छा आहे त्या सर्वांना Sunyatee Foundation तर्फे हार्दिक निमंत्रण, 500 लोकांची मर्यादित क्षमता लक्षात घेऊन आम्ही सर्वांना विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर नोंदणी करावी. भोजन व्यवस्था असेल.
अधिक माहितीसाठी सुन्यती स्वयंसेवकांशी 8788889321, 9422118895 या क्रमांकावर संपर्क साधता येईल.