संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- लाखनी भंडारा येथे राष्ट्रीय अमरकला निकेतन आणि वंचित बहुजन आघाडी तर्फे संयुक्त विदर्भ स्तरीय लोककला महोत्सव बगळे सेलिब्रेशन सभागृह लाखनी येथे नुकतेच संपन्न झाले.यावेळी संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ लोकशाहीर अंबादास नागदेवे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी शाहीर राजेंद्र भीमराव बावनकुळे ( आकाशवाणी, कॅसेट सिंगर) अध्यक्ष भारतीय कलाकार शाहीर मंडळ ऑल इंडिया,मानधन समिती सदस्य यांचे शाल श्रीफळ स्मुर्ति चिन्ह पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक प्रमुख पाहुणे ज्येष्ठ शाहीर गरीबा काळे,शाहीर ललकार चौहान,शाहीर आर्यन नागदेवे,आयोजक श्रीकांत नागदेवे, भगवान लांजेवार, अरुण मेश्राम,प्रदीप कडबे,रवींद्र मेश्राम, गजानन वडे,रमेश रामटेके,गिरिधर बावणे,भूपेश बावनकुळे, यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार करण्यात आले.यावेळी कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येने शाहीर कलाकार उपस्थित होते.