– पोलीस स्टेशन रामटेकची कारवाई
रामटेक :- दिनांक १३/०८/२०२३ रोजीचे ०३.१५ वा. दरम्यान पोलीस रामटेक येथील स्टाफ पोलीस स्टेशन रामटेक हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना गुप्त बातमीदारांकडुन माहिती मिळाली की, एक निळया रंगाचा ट्रॅक्टर मध्ये कारवाही गावाचे रोडने अवैधरित्या विनापरवाना रेतीची वाहतुक होत आहे. अशा मिळालेल्या विश्वसनिय माहिती वरून नमुद घटनास्थळी नाकाबंदी केली असता स्टाफसह कारवाही गावात जाणाच्या मार्गावर उभे असतांना दि. १३/०८/२०२३ चे ०३.०० वा. सुमारास गावात एक ट्रॅक्टर येतांना दिसल्याने त्यास हात दाखवुन थांबण्याचा इशारा केला. त्यावरून ट्रॅक्टर चालकाने ट्रॅक्टर रोडच्या बाजुला थांबविला तेव्हा सदर ट्रॅक्टरची पाहणी केली असता सदर ट्रॅक्टरचा क्र. एम. एच. ४० / सी. ए.- ८४०९ असा दिसल्याने सदर ट्रॅक्टर चालकास त्याचे नाव गाव पत्ता विचारले असता त्याने आपले नाव निलेश इन्च्छलाल दमाहे, वय ३७ वर्ष, रा. चिचाळा ता. रामटेक असे सांगितले. त्यानंतर त्यास ट्रॅक्टरच्या मागील डाल्यात काय आहे? असे विचारले असता त्याने रेती (वाळू असल्याचे सांगितले. तेव्हा त्यास रेती वाहतुकीबाबत परवाना विचारले असता त्याने परवाना नाही असे सांगितल्याने सदर ट्रॅक्टर चालकाचे ताब्यातून ट्रॅक्टर क्र. एम. एच. ४० सी.ए. ८४०९ किंमती ८००,०००/- रु. व अंदाजे १ ब्रास रेती ३०००/- रु. प्रति ब्रास प्रमाणे किंमती ३,०००/- रु. असा एकुण ८०३,०००/- रू. चा मुद्देमाल जप्त करून पोलीस ठाणे रामटेक येथे आरोपीविरूद्ध कलम ३७९ भादवि. अन्वये गुन्हे नोंद करण्यात आलेला असुन पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. सदर कारवाई विशाल आनंद पोलीस अधिक्षक नागपूर ग्रामीण, डॉ. संदिप पखाले अपर पोलीस अधिक्षक नागपूर ग्रामीण उपविभागीय पोलीस अधिकारी रामटेक विभाग आशित कांबळे, पोस्टे रामटेक येथील ठाणेदार पोलीस निरीक्षक उदय नारायण यादव, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत लांजेवार, पोलीस नायक मंगेश सोनटक्के, प्रफुल रंधई, पोलीस शिपाई शरद गिते यांनी केली आहे.