नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या विविध विकास कार्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवार ५ ऑगस्ट रोजी भूमिपूजन व लोकार्पण करण्यात येणार आहे. मुख्य कार्यक्रम शिवाजी चौक, फ्रेन्डस कॉलनी, हजारिपहाड, डी. पी. रोड, नागपूर येथे सायंकाळी ७.०० वाजता होणार आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार असून, याप्रसंगी सर्वश्री आमदार प्रवीण दटके, ऍड. अभिजीत वंजारी, चंद्रशेखर बावनकुळे, सुधाकर अडबाले, डॉ. नितीन राऊत, कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, मोहन मते, विकास ठाकरे, पोलिस आयुक्त अमितेश कुमार, मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, मनपाच्या अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते नागपूर महानरपालिकेच्या वतीने तयार करण्यात येणाऱ्या पांचपावली अग्निशमन केन्द्र व कर्मचारी संकुल बांधकामाचे भूमीपूजन करण्यात येणार आहे. तसेच केंद्र शासन पुरस्कृत १५ व्या वित्त आयोगाअंतर्गत पोलिस लाईन टाकळी तलाव पुनरूज्जवन प्रकल्पाचे भूमीपूजन व फ्रेंन्डस कॉलनी घाट चौक ते हजारिपहाड बसस्टॉप पर्यंत १८.०० मी. रुंद डी.पी. रस्त्याचे लोकार्पण मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहावे असे आवाहन मनपाचे सर्वश्री मुख्य अभियंता राजीव गायकवाड,अधीक्षक अभियंता मनोज तालेवार व डॉ. श्वेता बॅनर्जी यांनी केले आहे.
कार्यक्रमाचे स्थळ व वेळ
– पाचपावली अग्निशमन केंद्र व कर्मचारी संकुल बांधकामाचे भूमिपूजन.
स्थळ- कमाल चौक, नागपूर,
वेळ:- सायंकाळी ६.०० वा.
– पोलिस लाईन टाकळी तलाव पुनरुज्जीवन प्रकल्पाचे भूमिपूजन.
स्थळ – पोलीस टाकळी तलाव, नागपूर,
वेळ:- सायंकाळी ६.३० वा.
– फ्रेन्डस कॉलनी घाट चौक ते हजारीपहाड बस स्टॉप पर्यंत १८.०० मी. रुंद डी. पी. रस्त्याचे लोकार्पण कार्यक्रम.
स्थळ – शिवाजी चौक, फ्रेन्डस कॉलनी, हजारिपहाड, डी. पी. रोड, नागपूर,
वेळ:- सायंकाळी ७.०० वा.