मुंबई, दि. 4 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी जे.जे. रुग्णालय येथे दिवंगत कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केले आणि त्यांचे अंतिम दर्शन घेऊन भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा तसेच आमदार आशिष शेलार यांनीही दिवंगत नितीन देसाई यांच्या पार्थिवाला पुष्पहार अर्पण करून दर्शन घेतले.