नागपूर :- नागपूर महानगरपालिका कार्यक्षेत्रात दि. 03/08/ 2023 रोजी धंतोली झोन अंतर्गत प्लॉट नं. 77, कृषी नारा सोसायटी, मनिष नगर येथे आरोग्यवर्धिनी केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. केंद्र शासनाकडून 15 व्या वित्त आयोग निधी अंतर्गत नागपूर शहराकरीता राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत वर्ष 2022-23 करीता 20 आरोग्यवर्धिनी केंद्राची मान्यता प्राप्त झाली आहे. तसेच पुढील अधिक आरोग्यवर्धिनी केंद्राची मंजूरी मिळण्याची शक्यता आहे. आजपावेतो एकूण 6 आरोग्यवर्धिनी केंद्राची सुरवात झालेली होती.
या शृंखलेत गोरले ले-आऊट येथे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना तसेच रहाटे टोली येथे रहाटे नगर (रामटेके नगर) आरोग्यवर्धिनी केंद्र, श्यामनगर (भवानी नगर), रोज नगर, नागोबा मंदिर, न्यु म्हाळगी नगर, बाबा दिप सिंग नगर, समता नगर पूल व आता कृषी नारा सोसायटी, मनिष नगर येथे सातव्या आरोग्यवर्धिनी केंद्राची सुरवात करण्यात आली आहे.
आरोग्यवर्धिनी केंद्रांमार्फत जनसामान्यांपर्यंत प्राथमिक आरोग्य सेवा निःशुल्क पूरविल्या जाणार आहेत. तसेच माताबाल आरोग्य, लसीकरण व इतर सेवा देखील मोफत दिल्या जातील.
कृषी नारा सोसायटी, मनिष नगर आरोग्यवर्धिनी केंद्राचे उद्घाटन महेश धामेचा सहा.आयुक्त, धंतोली झोन यांचे हस्ते तसेच डॉ.नरेंद्र बहिरवार वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांचे अध्यक्षतेखाली करण्यात आले. उद्घाटना प्रसंगी डॉ. विजय जोशी अति. वैद्यकीय आरोग्य अधिकारी, डॉ. मेघा जैयतवार झोनल वैद्यकीय अधिकारी, डॉ. सरला लाड माता व बाल संगोपन अधिकारी, डॉ. आकाश गौरखेडे वैद्यकीय अधिकारी, डॉ. दिपाली तायडे वैद्यकीय अधिकारी, डॉ. अश्विनी निकम, निलेश बाभरे, प्राचार्य प्रकाश वाहणे, विजय गोल्हर आदि उपस्थित होते.
तसेच कार्यक्रमाला चिंचभवन नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.