अरोली :- दिनांक ३१/०७/२०२३ च्या रात्री ०९.३० वा.च्या सुमारास पो.स्टे. अरोली हद्दीत फिर्यादी व फिर्यादीचे घरचे सर्व कुटुंब जेवण करून घरीच समोरच्या खोलीमध्ये झोपले असता दि. ३१/०७/२०२३ रोजी रात्री १२.०० वा. दरम्यान फिर्यादीला झोपेतून जाग आली. तेव्हा फिर्यादीला मोठी मुलगी दिसून आली नाही. त्यावेळी फिर्यादीला वाटले की, फिर्यादीचे घराशेजारी राहणारा फिर्यादीचा लहान भाऊ संदिप रमेश गजबे यांच्याकडे झोपायला गेली असेल म्हणून फिर्यादी व फिर्यादीची पत्नी फिर्यादीचे भावाचे घरी जावून मोठया मुली बाबत विचारपुस केली. परंतु त्याने मोठी मुलगी त्याच्याकडे आली नसल्याचे सांगितले. त्यामुळे फिर्यादीने मोठ्या मुलीचा गावातील रस्त्याने तसेच रामटेक कडे जाणाऱ्या रोडने शोध घेतला. तसेच नातेवाईकांच्या घरी शोध घेतला परंतु ती मिळून आली नाही. फिर्यादीची मोठी मुलगी ही संशयित आरोपी नामे- सोनु राजु डोईफोडे, रा. बेरडेपार याच्यासोबत पळून गेली असल्याचे फिर्यादीला संशय असल्याने फिर्यादीने त्याच्या गावातील लोकांना फोन करून त्यांच्याबाबत चौकशी केली असता तो रात्रीपासून गावात नसल्याची माहीती मिळाली फिर्यादीची मोठी मुलगी वय १५ वर्ष हीचे मागील २ वर्षापासुन बेरडेपार येथील सोनु राजु डोईफोडे याच्यासोबत प्रेमसंबंध होते. त्याने दि.. ३०/०७/२०२३ ९/३० वा. ते दि. ३१/०७/२०२३ रोजी रात्री १२ / ३० वा. फिर्यादीचे मुलींच्या अज्ञानतेचा फायदा घेवुन तिला फुसलावुन पळवून नेले आहे. सदर प्रकरणी फिर्यादी यांच्या रिपोर्टवरून पो.स्टे. अरोली येथे आरोपीविरुध्द कलम ३६३ भादवि कायद्यान्वये गुन्हा नोंद केला आहे. आरोपीचा शोध घेणे सुरू असून सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सोनवणे हे करीत आहे.