मौदा :- दिनांक २६/०७/२०२३ चे ११.०० वा. ते ०७.३० वा. चे सुमारास फिर्यादीची पत्नी यांची प्रकृती खराब असल्याने त्यांचा उपचार मेडीकल कॉलेज नागपूर येथे सुरु असल्याने ते दोघेही नागपूर येथे राहतात व त्यांची मुलगी वय १६ वर्ष व मूलगा वय १० वर्ष दोन्ही मुलं आहेत. दि. २६.०७.२०२३ रोजी सायंकाळी ७.३० वा. फिर्यादी यांचे घराशेजारी राहणारी यांनी फोन करुन सांगीतले की, तुमची मूलगी ही सकाळ पासून शाळेत गेली पण आता पर्यंत घरी परत आली नाही त्यावरून यातील फिर्यादी यांनी दि. २७.०७.२०१३ रोजी सकाळी घरी येवून नातेवाईक गावामध्ये शाळेमध्ये आजूबाजूला शोध घेतला मूलगी मिळून आली नाही. मुलगी हिला दि. २६.०७.२०२३ चे सकाळी ११.०० वा. ते सायंकाळी ०७.३० वा. दरम्यान कोणीतरी अज्ञात इसमाने फुस लावून पळवून नेले आहे. सदर प्रकरणी फिर्यादी यांच्या रिपोर्टवरून पो.स्टे. मौदा येथे आरोपीविरुद्ध कलम ३६३ भादवि कायद्यान्वये गुन्हा नोंद केला आहे. आरोपीचा शोध घेणे सुरू असून सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस हवालदार राजेंद्र अडाने व नं १२८७ हे करीत आहे.