संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- मागिल काही दिवसापासून वातावरणात बदल झाल्यामुळे कामठी तालुक्यातील शहर तसेच ग्रामीण भागातील अनेक नागरिक डोळ्यांच्या संसर्गाने त्रस्त झाले आहेत. तर अनेकाना डोळे लाल होणे, डोळ्यांना सूज येणे असाही त्रास होत आहे.
वातावरणात झालेला बदल आणि अधूनमधून कोसळणारा मुसळधार पाऊस ,ढगाळ वातावरण असे बदल सातत्याने होत आहे.याचा परिणाम म्हणून डोळ्यांचा संसर्ग वाढत असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले असून हा आजार संसर्गजन्य असल्याने कुटुंबातील अनेकांना याचा त्रास होतो त्यामुळे नागरीकानी योग्य ती काळजी घ्यावी आणि कोणतेही लक्षणे असल्यास त्वरित औषधोपचार करावा. मनाने कोणतेही औषधे घेऊ नयेत वा डोळ्यात कोणतेही औषध टाकू नये असे आवाहनही डॉक्टर कडून करण्यात येत आहे.
-डॉ शबनम खाणुनी
-डोळे येणे हा एक प्रकारचा संसर्गजन्य रोग आहे.जो विशेषतः पावसाळयात होतो.कधी दोन्ही डोळ्यावरही त्याचा संसर्ग होतो.डोळ्यांना खाज चिकटपणा,,डोळ्यांना सूज ,डोळे लालसर होणे ,डोळयातुन पिवळा द्रव बाहेर येणे असे झाल्यास डोळयांना स्वच्छ पाण्याने सतत धुवा.इतर व्यक्तींच्या रुमाल,टॉवेल ,कपडे इत्यादीने आपले डोळे पुसू नये.डोळ्यांना सतत स्पर्श करू नये.उन्हात बाहेर पडताना गॉगल्स चा वापर करावा .सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवावा व डॉक्टरच्या सल्ल्यानुसारच औषधोपचार करावा