नागपूर :-पो.स्टे. एम.आय.डी.सी. बोरी अंतर्गत ०२ किमी अंतरावर टाकळघाट ता. हिंगणा येथे दिनांक २४/०७/२०२३ ०४.०० वा. ते ०४.१५ वा. दरम्यान फिर्यादी नामे- प्रविण भगवंतराव उमाटे, वय ४३ वर्ष, रा. वार्ड क्र. ३ टाकळघाट याचे टाकळघाट येथे किराणा दुकान हे मेन रोडवर असुन फिर्यादीच्या दुकानाचे घरमालक मागील बाजुस राहतात. दि २४/०७/२०२३ रोजी पहाटे ०४/०० वा. घरमालकाचे जावई यांचा फोन आला की आपले दुकानाच्या दरवाजासमोर कोणीतरी एक नवजात शिशू महीला जातीचे अंदाजे ६ ते ७ दिवसाचे बाळ पडुन असलेले दिसले असल्याने त्याचा परीत्याग करण्याचा उद्देशाने त्यास उघडया जागेवर नवजात शिशुची आई महिला हिने सोडुन दिले आहे. सदर प्रकरणी फिर्यादी यांच्या रिपोर्टवरून पो.स्टे. एम. आय. डी. सी. बोरी येथे महिला आरोपीविरुध्द कलम ३१७ भादवि कायद्यान्वये गुन्हा नोंद केला आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोलीस हवालदार प्रशांत काळे हे करीत आहे.
@ फाईल फोटो