नागपूर :- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सोमवार (ता.24) 08 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 45 हजार रुपयांचा दंड वसूल केला. लक्ष्मीनगर झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. फॉर्टुना कॅपिटल, रामदासपेठ, नागपूर यांच्यावर रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. धरमपेठ झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. ए.डी.बी. अकाऊटीग एकॅडमी, रविनगर चौक, नागपूर व मे. गायकवाड कोचींग क्लासेस, धंतोली, नागपूर यांच्यावर इलेक्ट्रीक पोलवर अनधिकृतपणे बॅनर व होर्डींग लावल्याबाबत कारवाई करून प्रत्येकी 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
हनुमान नगर झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. अभ्याकस सेंटर, न्यु सुभेदार लेआऊट, नागपूर इलेक्ट्रीक पोलवर अनधिकृतपणे बॅनर व होर्डींग लावल्याबाबत कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच स्वाती उपाध्यय, नंदीनी नगर, नरसाळा, नागपूर यांच्यावर बांधकाम साहित्यचा कचरा रस्त्याच्या कडेला पसरविल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. गांधीबाग झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. धार्मिक किराणा स्टोर्स, इतवारी नागपूर तसेच मे. राज किराणा स्टोर्स, टेलिफोन एक्सचेंज चौक, नागपूर यांच्यावर प्लास्टिक पिशवीच्या वापर केल्याबद्दल कारवाई करून प्रत्येकी 5 हजार रुपयांचा दंड वसूल केला. सतरंजीपुरा झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. क्रिष्णा स्विटस, बिनाकी, मंगलवारी, नागपूर यांच्यावर प्लास्टिक पिशवीच्या वापर केल्याबद्दल कारवाई करून ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.